जालना - गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या धार्मिक स्थळांचे प्रवेशद्वारे आज उघडली. जालना शहरातील पुरातन मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम संस्थान आनंदवाडी या मंदिराचे प्रवेशद्वार आज सकाळी भाविकांच्या उपस्थितीमध्ये उघडण्यात आले. त्यानंतर परंपरेनुसार काकड आरती आणि आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण-
गेल्या आठ महिन्यांपासून मंदिरे बंद असल्यामुळे भक्तांमध्ये नाराजीचा सूर होता. मात्र आता मंदिरे उघडल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मंदिरे ही संस्कार करण्याची ठिकाणे असल्याचे पुजाऱ्यांनी सांगितले.
खरेतर मंदिर उघडण्यासाठी खूप उशीर झालेला आहे. मात्र आज बलिप्रतिपदेच्या निमित्ताने सुरू झालेल्या या मंदिरांमुळे भाविकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया श्रीराम मंदिर संस्थान चे व्यवस्थापक रामदास महाराज आचार्य यांनी दिली.
उत्साह पावल्या आणि औक्षण करून आनंदोत्सव साजरा-
मंदिराच्या गाभार्यामध्ये सकाळीच सहा वाजेच्या सुमारास, सूर्योदयाला भजन-कीर्तनाचे आवाज घुमू लागले. त्यापाठोपाठ भाविकांनी पावली खेळत आणि देवाला औक्षण करून आनंदोत्सव साजरा केला.
हेही वाचा- उघडले देवाचे द्वार! पाडव्याच्या मुहूर्तावर उघडली राज्यातील प्रार्थनास्थळे...