ETV Bharat / state

बदनापूरात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन'लाच वेळेचे नियोजन हुकले - corona in jalna

कोरोनाची लस काही दिवसात येणार असल्याने शासनाने तरी सुरु केली आहे. व त्या दृष्टीने ८ जानेवारी रोजी बदनापूर ग्रामीण रुग्णालयात सकाळी १० ते १ या वेळेत लसीकरणाचे ड्राय रन आयोजित करण्यात आले होते. मात्र

बदनापूर ग्रामीण रुग्णालय
बदनापूर ग्रामीण रुग्णालय
author img

By

Published : Jan 8, 2021, 7:44 PM IST

बदनापूर (जालना)- कोरोनाची लस काही दिवसात येणार असल्याने शासनाने तरी सुरु केली आहे. व त्या दृष्टीने ८ जानेवारी रोजी बदनापूर ग्रामीण रुग्णालयात सकाळी १० ते १ या वेळेत लसीकरणाचे ड्राय रन आयोजित करण्यात आले होते. मात्र या साठी प्रशिक्षण दिलेले पोलीस, शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका कर्मचारी सकाळी १०:३० वाजेपर्यंत न आल्याने तारांबळ उडाली असून ड्राय रन लस कार्यक्रम १०:३५ वाजता सुरु करण्यात आला. २५ पैकी २४ जणांना लस देण्यात आली एक जण वैक्तिक कारणामुळे हजर राहू शकले नाही, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान २ जानेवारी रोजी शेलगाव येथे ड्राय रन घेण्यात आले. त्या तुलनेत आजचे नियोजन नगण्य दिसून येत होते.

आशा सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती पोलिसच आले उशिरा-

शुक्रवार ८ जानेवारी रोजी सकाळी १० ते १ यावेळेत बदनापूर ग्रामीण रुग्णालयात ड्राय रन घेण्यात येणार, अशी माहिती गुरुवारी संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र सकाळी १०:३० वाजेपर्यंत कर्मचारी हजर न झाल्याने समन्वयकांना संबंधित कर्मचाऱ्यांना वारंवार फोन करण्याची वेळ यावेळी आली. तर पोलिसांना सकाळी ९:४५ वाजता फोन केल्यानंतर पोलीस कर्मचारी १०:२५ वाजता हजर झाले. एकंदरीत ड्राय रन कार्यक्रमाचे संबंधितांना गांभीर्य नसल्याचे दिसून आले. यावेळी १०:३० वाजता विद्या पवार यांना लसीकरण करण्यात आले. याठिकाणी गेटवर नाव, आधार, ओळखपत्र तपासणी करण्यात आली. त्यानंतर लस हॉल मध्ये स‌ॅनिटाईज करून लस देण्यात आली. व नंतर निरीक्षण हॉल मध्ये ३० मिनिटे थांबण्याची सूचना दिली.

ग्रामीण रूग्णालयापेक्षा प्राथमिक आरोग्य केंद्रात दिसले गांभीर्य-

२ जानेवारी रोजी बदनापूर तालुक्यातील सेलगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश सोळूंके यांच्या नेतृत्वाखाली ड्राय रन घेण्यत आले. त्यावेळी सर्व कर्मचारी सकाळी ७ वाजता हजर झाले होते. व वेळेतच पूर्ण प्रक्रिया करण्यत आली होती. मात्र ग्रामीण रूग्णालयात आयोजित ड्राय रन च्या वेळी नियोजनाचा अभाव दिसून आला. १०:३५ वाजत घाईघाईत ड्राय रन ला सुरवात करून प्रत्यक्षिक सुरु झाले. आजच्या ड्राय रन मध्ये २५ पैकी २४ जणांनी सहभाग नोंदविला तर १ जन वैयक्तिक कारणामुळे हजर राहू शकले नाही, असे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.ओम ढाकणे यांनी सांगितले.

हेही वाचा- चंद्रपुरात शेतकऱ्यानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ताफा अडवला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.