बदनापूर - महिला व बालविकास विभागातर्फे स्तनदा माता व बालकांसाठी पोषण आहाराचे वाटप बदनापूर तालुक्यात सुरू करण्यात आले. यात कडधान्य, तेल, मीठ, गहू आणि तांदूळ यांचे 10 पॅकेट वाटप करण्यात येणार आहेत. पर्यवेक्षिका कमल गोसावी, संगीता घोडके यांच्या उपस्थितीत प्रत्येक अंगणवाडीत हे वाटप सुरू करण्यात आले आहे.
महिला व बालविकास विभागातर्फे स्वत:ची व मुलांची काळजी घेता यावी म्हणून पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. हे वाटप अंगणवाडीमार्फत करण्यात येते. बदनापूर तालुक्यातील स्तनदा माता व बालकांसाठी कडधान्य, तेल, मीठ, गहू आणि तांदूळ वाटप करण्यात येत आहे.
पोषण आहारात पौष्टीक अन्न-धान्याचे एकूण 10 पॅकेट असतात. लाभार्थीने प्रत्येकी 10 पॅकेट संबंधीत अंगणवाडीतून घेऊन जाण्याचे आवाहन पर्यवेक्षिका कमल गोसावी यांनी केले असून, जर 10 पेक्षा कमी पॅकेट एखाद्या अंगणवाडीत दिले तर थेट तक्रार करण्याचे आवाहनही गोसावी यांनी केले आहे.