ETV Bharat / state

जालन्यात संस्था आणि शिक्षकांच्या वादात विद्यार्थ्यांचे मरण; १६ दिवसांपासून विद्यार्थी मुख्याध्यापकांच्या दालनात - students

या संदर्भात संस्थाचालक टोलवाटोलवीचे उत्तर देत आहेत. यासंदर्भात शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना दिनांक 15 ला अंतिम पत्र देऊन हा विषय दोन दिवसात न सोडल्यास माहे जून महिन्याचे वेतन रोखण्याचा इशाराही दिला आहे.

संस्था आणि शिक्षकांच्या वादात विद्यार्थ्यांचे मरण, सोळा दिवसापासून विद्यार्थी मुख्याध्यापकांच्या दालनात
author img

By

Published : Jul 19, 2019, 9:22 PM IST

जालना - येथील जुन्या शाळेपैकी एक आणि नामवंत शाळा म्हणून श्री. महावीर स्थानकवासी जैन विद्यालयाचे नाव आहे. संस्थाचालकांच्या राजकारणामुळे ही शाळा नेहमीच चर्चेत असते. सध्या सहशिक्षक आणि संस्थाचालक यांच्या वादामुळे ही शाळा चर्चेत आली आहे. मात्र, या प्रकारामुळे गेल्या १६ दिवसांपासून सातवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेले आहे. 10 शिक्षकांसह विविध वर्गाच्या 8 तुकड्यांचे विद्यार्थी मुख्याध्यापकांच्या दालनासमोर रोज ठिय्या देऊन बसत आहेत.

संस्था आणि शिक्षकांच्या वादात विद्यार्थ्यांचे मरण, सोळा दिवसापासून विद्यार्थी मुख्याध्यापकांच्या दालनात

या संदर्भात संस्थाचालक टोलवाटोलवीचे उत्तर देत आहेत. यासंदर्भात शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना दिनांक 15 ला अंतिम पत्र देऊन हा विषय दोन दिवसात न सोडल्यास जून महिन्याचे वेतन रोखण्याचा इशाराही दिला आहे. या शाळेतील तीन महिला शिक्षिका आणि आठ शिक्षक यांना 18 मे 2016ला जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने सेवा सातत्य मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे या शिक्षकांची सेवा पुस्तिका तयार करण्याचे काम मुख्याध्यापकांनी करणे अपेक्षित होते. हजेरीपटावर या शिक्षकांची नावे सेवा ज्येष्ठतेनुसार चढत्या क्रमांकाने घ्यावयास हवी होती. मात्र, या दोन्हीमध्ये मुख्याध्यापकांनी हेतुपुरस्सर अडवणूक करून अद्याप कोणतीही सेवा पुस्तिका तयार न करणे आणि सेवा ज्येष्ठतेनुसार हजेरीपटावर नाव घेण्याचे टाळले.

सहा वर्षापासून विनाअनुदानित तत्त्वावर हे शिक्षक काम करत आहेत. त्यांना दोन महिन्यात एक रुपया देखील मानधन मिळालेले नव्हते. अशा परिस्थितीत काम करत असतानाही संस्थाचालक आणि मुख्याध्यापक दोघेही ही त्यांच्या या मागण्यांसंदर्भात टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे दोन जुलैपासून हे शिक्षक मुख्याध्यापकाच्या दालनासमोर ठिय्या मांडून बसले आहेत. पर्यायाने वर्गात शिक्षकच नसतील तर विद्यार्थ्यांनी काय करायचे? त्यामुळे विद्यार्थीदेखील मुख्याध्यापकांच्या दालनासमोर असलेल्या व्हरांड्यातच ठिय्या देऊन आहेत. आज या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेमध्ये येऊन मुख्याध्यापक वानगोता यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीन तास बसल्यानंतर ही त्यांची भेट होऊ शकली नाही. शेवटी या पालकांनी उपमुख्याध्यापक प्रतिभा श्रीपत यांची भेट घेऊन कैफियत मांडली. सोमवारपर्यंत जर हा तिढा सुटला नाही तर पूर्ण शाळा बंद पाडण्याचा इशाराही दिला.

ही गंभीर स्वरूपाची बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिनांक 6 ला मुख्याध्यापकांना पत्र पाठवून तीन दिवसात प्रकरण मिटविण्याचे सांगितले होते. मात्र, ते न मिटल्याने पुन्हा दिनांक 15 ला पत्र पाठवून दोन दिवसात हा विषय न सोडल्यास वेतन रोखण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण कोणत्या स्तरावर थांबणार हे सोमवारी पाहायला मिळेल.

Intro:येथील जुन्या शाळे पैकी एक आणि नामवंत शाळा म्हणून श्री. महावीर स्थानकवासी जैन विद्यालयाचे नाव आहे . संस्थाचालकांच्या राजकारणामुळे ही शाळा नेहमीच चर्चेत असते .सध्या सहशिक्षक आणि संस्थाचालक यांच्या वादामुळे चर्चेत आली आहे. परंतु या प्रकारामुळे गेल्या सोळा दिवसांपासून सातवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेले आहे .आणि 10 शिक्षकांसह विविध वर्गाच्या 8 तुकड्यांचे विद्यार्थी मुख्याध्यापकांच्या दालनासमोर रोज ठिय्या देऊन बसत आहेत. या संदर्भात संस्थाचालक टोलवाटोलवी चे उत्तर देत आहेत.
दरम्यान यासंदर्भात शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना दिनांक 15 रोजी अंतिम पत्र देऊन हा विषय दोन दिवसात न सोडल्यास माहे जून महिन्याचे वेतन रोखण्याचा इशाराही दिला आहे.

Body:या शाळेतील तीन महिला शिक्षिका आणि आठ शिक्षक यांना 18 मे 2016 रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने सेवा सातत्य मान्यता प्रदान केली आहे .त्यामुळे या शिक्षकांची सेवा पुस्तिका तयार करण्याचे काम मुख्याध्यापकांनी करणे अपेक्षित होते .तसेच हजेरीपटावर या शिक्षकांची नावे सेवाज्येष्ठतेनुसार चढत्या क्रमांक क्रमांकाने घ्यावयास हवी होती .मात्र या दोन्हीमध्ये मुख्याध्यापकांनी हेतुपुरस्सर अडवणूक करून अद्यापपर्यंत कोणतीही सेवा पुस्तिका तयार न करणे आणि सेवाज्येष्ठतेनुसार हजेरीपटावर नाव घेण्याचे टाळले. गेल्या सहा वर्षापासून विनाअनुदानित तत्त्वावर हे शिक्षक काम करीत आहेत त्यांना गेल्या दोन महिन्यात पर्यंत एक रुपया देखील मानधन मिळालेले नव्हते .अशा परिस्थितीत काम करीत असतानाही संस्थाचालक आणि मुख्याध्यापक दोघेही ही त्यांच्या या मागण्यांसंदर्भात टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे दोन जुलैपासून हे शिक्षक मुख्याध्यापकाच्या दालनासमोर ठिय्या मांडून बसले आहेत. पर्यायाने वर्गात शिक्षकच नसतील तर विद्यार्थ्यांनी काय करायचे? त्यामुळे विद्यार्थीदेखील मुख्याध्यापकांच्या दालनासमोर असलेल्या व्हरांड्यातच ठिय्या देऊन आहेत. आज या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेमध्ये येऊन मुख्याध्यापक श्री वानगोता यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तीन तास बसल्यानंतर ही त्यांची भेट होऊ शकली नाही .शेवटी या पालकांनी उपमुख्याध्यापक श्रीमती प्रतिभा श्रीपत यांची भेट घेऊन कैफियत मांडली. आणि सोमवार पर्यंत जर हा तिढा सुटला नाही तर पूर्ण शाळा बंद पाडण्याचा इशाराही दिला.
ही गंभीर स्वरूपाची बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिनांक 6 रोजी मुख्याध्यापकांना पत्र पाठवून तीन दिवसात प्रकरण मिटविण्याचे सांगितले होते मात्र. ते न मिटल्याने पुन्हा दिनांक 15 रोजी पत्र पाठवून दोन दिवसात न सोडल्यास माहे जून चे वेतन रोखण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण कोणत्या स्तरावर थांबणार हे सोमवारच्या पाहायला मिळेल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.