ETV Bharat / state

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे कोविड रुग्णांचा मृत्यू; नातेवाईकांचा पाच तास ठिय्या - due to negligence of doctors

एका चाळीस वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला असून, जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्तव्य बजावणारे डॉक्टर आणि नर्स जबाबदार असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे चिडलेल्या नातेवाईकांनी पाच तास जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात ठिय्या दिला तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

नातेवाईकांचे पाच तास आंदोलन
नातेवाईकांचे पाच तास आंदोलन
author img

By

Published : Apr 15, 2021, 7:54 PM IST

Updated : Apr 16, 2021, 12:19 PM IST

जालना - एका चाळीस वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला. या मृत्यूला जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्तव्य बजावणारे डॉक्टर आणि नर्स जबाबदार असल्याचा ठपका ठेवून रुग्णांच्या नातेवाईकांनी पाच तास जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात ठिय्या दिला. तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे कोवीड रुग्णांचा मृत्यू
जुना जालना भागातील इंदिरानगर भागात राहणारे कचरू मानसिंग पिंपराळे (40), यांना काही दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने एका खाजगी रुग्णालयात भरती झाले. या रुग्णालयातील डॉक्टरांनी सिटीस्कॅन करण्यास सांगितले. आणि ते केल्यानंतर या रुग्णाचा स्कोर 21 आला. ही धोक्याची घंटा आणि भविष्यात येणारा खर्च लक्षात घेता डॉक्टरांनी रुग्णाला सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. त्यानुसार 13 तारखेला संध्याकाळी सात वाजता या रुग्णाला सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले. संध्याकाळी सात वाजता भरती केलेल्या रुग्णाला दिनांक 14 रोजी दुपारी आयसीयूच्या बाहेर काढले. आणि जनरल वॉर्डमध्ये आणले. रुग्णाने त्रास होत असल्याचे सांगितले तरीही, परिचारिका आणि डॉक्टरांनी हलगर्जीपणा करून रुग्णाला आयसीयूच्या बाहेर काढले, असा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे. तसेच नातेवाईकांनी कोणतीही सूचना न देता हा मृतदेह इतरत्र हलविला आहे. त्यामुळे कर्तव्य बजावत असलेल्या डॉक्टर्स आणि परिचरिकांवर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा या नातेवाईकांनी घेतला होता.
नातेवाईकांचा पाच तास ठिय्या
नातेवाईकांचा पाच तास ठिय्या

आज सकाळी रुग्णाच्या मुहूर्ताची बातमी कळल्यानंतर नातेवाइकांनी कोविड रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यांची समजूत काढण्यासाठी सहायक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ यांना बोलावण्यात आले. आणि नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तरीही रुग्णांचे नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे हे रुग्ण पुन्हा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात गेले, आणि आपली कैफियत मांडली .

'चौकशी करून कारवाई करू'

सामान्य रुग्णालयात भरती झालेला रुग्णाचा स्कोर 21 होता. त्यामुळे जेव्हा हे भरती झाले त्याच वेळेस परिस्थिती गंभीर होती. आणि अशा परिस्थितीत हे रुग्ण सुविधा नसलेला रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याने ती अधिकच खालावली. नियमानुसार सामान्य रुग्णालयात भरती झाल्यावर त्यांना सर्वतोपरी उपचार केले आहेत. मात्र तरीदेखील रुग्णाच्या नातेवाईकांच्या मागणीनुसार आपण या प्रकरणात कुठे दिरंगाई झाली का याची चौकशी करून योग्य ती कारवाई करू, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली आहे.

Last Updated : Apr 16, 2021, 12:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.