ETV Bharat / state

कोरोनाची तिसरी लाट येणे आपल्या हातात नाही, मात्र नियम पाळणे आपल्या हातात आहे -राजेश टोपे - Health Minister Rajesh Tope's press conference

कोरोनाची तिसरी लाट सुदैवाने येऊ नये, परंतु ती येईल की नाही, हे आपल्या हातात नाही. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळणे आपल्या हातात आहे, अस मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते.

आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Aug 2, 2021, 5:35 PM IST

जालना - कोरोनाची तीसरी लाट यायची तेव्हा येईल, ती कधी येईल हे सांगायला आपण काही भविष्यकार नाही, पण काळजी घेणे आपल्या हातात आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी लसीकरण करुन घेऊन प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळावेत, अशी विनंती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. जालना येथील आरोग्य विभागाकडून (जिरडगाव ता. घनसावंगी) येते प्राथमिक आरोग्य केंद्राचे टोपे यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आरोग्यमंत्री राजेश टोपे जालना येथे पत्रकारांशी बोलताना

'तिसरी लाट येणे आपल्या हातात नसले तरी नियम पाळणे आपल्या हातात आहे'

आयआयटी कानपूरमधील तज्ञांनी कोरोनाची तीसरी लाट याच महिन्यात येणार असल्याचे सांगत ऑक्टोबरमध्ये ही लाट अतिशय घातक असेल, असा अहवाल दिला आहे. त्यावर टोपे बोलत होते. तिसरी लाट येणे आपल्या हातात नसले तरी नियम पाळणे आपल्या हातात आहे, असही टोपे यावेळी म्हणाले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे जालना येथे कार्यक्रमात बोलताना

'मी आरोग्यमंत्री झाल्यानंतर राज्याला एक हजार रुग्णवाहिका'

गावात पेशंट असले की लगेच (102) या नंबरला कॉल करायचा. जालन्यात 43 रुग्णवाहिका दिलेल्या आहेत. त्यामुळे गावातील किंवा गावकूसाबाहेरील माता भगिनींना तत्काळ सेवा मिळायला हवी. कुणीही या सेवेपासून वंचित राहता कामा नये. कारण, या सगळ्या सुविधा या गोरगरिबांसह सर्व माताभगिनींना मिळायला हव्यात या उद्देशाने या सुविधा दिलेल्या आहेत, असेही टोपे म्हणाले आहेत.

'आता सर्व सुविधायुक्त कॉर्टर'

ग्रामीण भागात आरोग्य केंद्र हे गावकूसाबाहेर असते. त्यामुळे उपकेंद्र येथे डॉक्टर नर्सेस हे येथे कधीच नसतात. त्यामुळे आता सर्व सुविधायुक्त कॉर्टर बांधले आहेत. आता यामध्ये डॉक्टरपासून सर्वांना राहता येईल, अशी सुविधा तयार करण्यात आल्याची माहिती टोपे यांनी यावेळी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.