ETV Bharat / state

'कोरोना'ची दहशत : रंगपंचमीसाठी बाजारपेठ सजली, ग्राहकांची मात्र खरेदीकडे पाठ - होळी रंगपंचमी साहित्य विक्रीत घट

भोकरदनमध्ये स्वदेशी रंग आणि विविध साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याचे विक्रेते सांगत आहेत. यावर्षी 50 टक्केहुन अधिक विक्रीवर परिणाम झाल्याचे विक्रेते सांगत आहेत.

corona affects holi and Rangpanchami festival
भोकरदन शहरातील बाजारपेठेवर कोरोनाचा प्रभाव
author img

By

Published : Mar 9, 2020, 1:59 PM IST

जालना - भोकरदनमध्ये स्वदेशी रंग आणि विविध साहित्यांनी होळी आणि रंगपंचमीसाठी बाजारपेठ सजल्याचे दिसत आहे. मात्र, कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे खरेदीसाठी ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. विक्रेत्यांनी दुकानांमध्ये होळी-धुलिवंदनसाठी आवश्यक त्या मालाची आवक केली आहे, मात्र विक्री कमी असल्याचे विक्रेते सांगत आहेत.

भोकरदन शहरातील बाजारपेठेवर कोरोनाचा प्रभाव... होळी आणि रंगपंचमीच्या साहित्य विक्रीत घट

हेही वाचा.... 'कोरोना'मुळे रंगाचा बेरंग, रंग खरेदीकडे नागरिकांनी फिरवली पाठ

चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले. त्यानंतर आता संपूर्ण जगभरात त्याची दहशत असल्याचे पहायला मिळत आहे. भारतात देखील या विषाणूची दहशत असल्याचे दिसत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून त्याचे सावट होळी आणि रंगपंचमी सणावर पसरले आहे. चीनमधील साहित्य जरी शहरात विक्रीसाठी आणले नसले, तरीही व्यापाऱ्यांनी स्वदेशी रंग आणि साहित्य विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. मात्र, कोरोना व्हायरसच्या भीतीने नागरिकांनी साहित्य खरेदीकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. यामुळे या वर्षी विक्री घटल्याचे व्यापारी आणि विक्रेते सांगत आहेत.

हेही वाचा... कोरोनाबाबत दक्षता घेत मुंबईत होळीनिमित्त होणाऱ्या पार्ट्या रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.