जालना- इलेक्ट्रॉनिक बाईकची ट्रायल करण्याचा बहाणा करून ग्राहकाने इलेक्ट्रिक स्कुटी घेऊन ( Electronic bike theft case in Jalna ) पोबारा केला आहे. ही घटना भोकरदन नाका परिसरातील एनआरजी ऑटो इलेक्ट्रिक इंडस्ट्रीजच्या शोरुममध्ये घडली आहे. आरोपी हा सीसीटीव्हीत ( CCTV catch bike theft case ) कैद झाला आहे.
जालन्यातील भोकरदन नाका परिसरात एनआरजी ऑटो इलेक्ट्रिक इंडस्ट्रीज ( NRG Auto Electronic showroom ) हे शोरुम आहे. या शोरुममध्ये आलेल्या 30 ते 32 वर्षांच्या ग्राहकाने सेल्समनकडे इलेक्ट्रिक स्कुटी खरेदी करणार असल्याचे सांगितले. स्कुटीवरून ट्रायल मारू ( electronic bike theft while trial ) द्या, अशी विनंती सेल्समनला केली. सेल्समनने शोरूम बाहेर स्कुटी आणत, त्या अज्ञात तरुणाच्या ताब्यात दिली. मात्र, ट्रायल मारण्यासाठी स्कुटीवरून गेलेला हा तरुण पुन्हा स्कुटी घेऊन आला नाही.
हेही वाचा-Intercaste Love Marriage : आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलाच्या घरावर हल्ला; गुन्हा दाखल
पोलिसांकडून तपास सुरू-
शोरूमच्या सेल्समनने या अज्ञात तरुणा विरोधात बाजार पोलिसांत तक्रार दिल्याचे शोरुमचे मालक रवींद्र गायकवाड यांनी सांगितले. पोलिसांनी स्कुटी घेऊन पळून जाणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत ( Jalna crime news ) आहेत.