जालना - मागील काही दिवसांपूर्वी भोकरदन तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ठेवलेले मका, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी राजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यानी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली आहे. या नुकसानीचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - अजित पवारांचे बंड फसले, भ्रमाचा भोपळा फुटला; 'सामना'तून 'बाण'
यावेळी जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जालना जिल्हा सिओ निमा अरोरा, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, भोकरदनचे तहसीलदार संतोष गोरड, भोकरदन तालुका कृषी अधिकारी व्यवहारे, जिल्हा परिषद सदस्य आशाताई पांडे तसेच कृषी विभागातील व महसूल मंडळातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.