ETV Bharat / state

गरजूंना कुरियरद्वारे मिळणार रक्तपुरवठा - Blood Service by courier in Jalana

संचारबंदीमुळे रक्तदात्यांची संख्या कमी झाली असली, तरी रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रक्ताचे सर्व प्रकार या रक्तपेढीमध्ये उपलब्ध आहेत.

Blood Service will available by courier in Jalana
गरजूंना कुरियर द्वारे मिळणार रक्तपुरवठा
author img

By

Published : Mar 24, 2020, 9:29 AM IST

Updated : Mar 24, 2020, 10:05 AM IST

जालना - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. दळणवळण बंद झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही रुग्णालयात रुग्णाला रक्ताचा तुटवडा भासू नये, म्हणून कुरीअरद्वारे रक्तपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जनकल्याण रक्तपेढीचे संचालक पुसाराम मुंदडा यांनी सांगितले.

संचारबंदीमुळे रक्तदात्यांची संख्या कमी झाली असली, तरी रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रक्ताचे सर्व प्रकार या रक्तपेढीमध्ये उपलब्ध आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांनी घाबरून न जाता रक्तपेढीमध्ये संपर्क साधल्यास त्यांना संबंधित हॉस्पिटलमध्ये हवे असलेले रक्त उपलब्ध करून दिले जाईल. त्यासाठी जनकल्याण रक्तपेढी २४ तास उपलब्ध आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा -जालन्यात 'लॉकडाउन'चं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

जालन्यात सध्या जालना वैद्यकीय सेवा प्रतिष्ठान संचलित जनकल्याण रक्तपेढी, सामान्य रुग्णालयातील शासकीय रक्तपेढी आणि अन्य एक अशा तीनच रक्तपेढ्या कार्यरत आहेत. त्यामुळे रक्ताचा भरपूर साठा उपलब्ध आहे. मात्र, पुरवठ्याअभावी कोणत्याही रुग्णाचा जीव धोक्यात येऊ नये, म्हणून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असेही मुंदडा यांनी सांगितले.

हेही वाचा -#COVID -१९ : परदेशातील 60 पैकी 12 नागरिक परतले, तपासणीसाठी शोध सुरू

Last Updated : Mar 24, 2020, 10:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.