ETV Bharat / state

Audio Clip Viral Case : बबनराव लोणीकर यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; दिनकर घेवंदे यांची तक्रार

लोणीकरांवर जालन्यातील तालुका जालना पोलिसांत अँट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकरांविरोधात जालना जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

बबनराव लोणीकर
बबनराव लोणीकर
author img

By

Published : Apr 2, 2022, 7:26 AM IST

जालना - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकरांनी महावितरणच्या औरंगाबादमधील इंजिनिअरला शिवीगाळ केल्या प्रकरणी त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना पोलिसांत लोणीकरांविरोधात जालना जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

बबनराव लोणीकर यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

दलितांचा अवमान झाल्याचा आरोप - औरंगाबाद मधील महावितरणच्या इंजिनिअरला शिवीगाळ करणे बबनराव लोणीकरांना चांगलच महागात पडले आहे. लोणीकरांवर जालन्यातील तालुका जालना पोलिसांत अँट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकरांविरोधात जालना जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये लोणीकरांकडून दलितांचा अवमान झाल्याचा आरोप घेवंदे यांनी केला होता.

अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

ऑडिओ क्लिप व्हायरल - आमचे काय मीटर काढता, झोपडपट्टीवर जाऊन आकडे काढा, असे लोणीकरांनी म्हटले असून ही ऑडीओ क्लीप संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाली आहे. त्यामुळे दलित समाजाचा अवमान झाला असून माझ्याही भावना दुखावल्या गेल्याची तक्रार घेवंदे यांनी पोलिसांत केली होती. दिनकर घेवंदे यांच्या तक्रारीनंतर लोणीकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.