जालना - महाराष्ट्र शासन आणि श्री. श्री. रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हींगतर्फे जिल्ह्यातील डोंगर रांगांवर ६० किलोमीटरपर्यंत 'माथा ते पायथा' पाणलोट उपक्रम राबवला आहे. माथ्यावर पडलेला पाण्याचा प्रत्येक थेंब या पाणलोटाच्या माध्यमातून जिरवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
पाणलोट विकासाचा प्रकल्प हाती घेण्यासाठी गेल्या ५ एप्रिलला सुरुवात झाली. हा प्रकल्प कुठे राबवायचा आणि तांत्रिक दृष्ट्या तो यशस्वी कसा होईल? याची सर्व माहिती गोळा करायला यंत्रणा कामाला लागली. तज्ज्ञ येऊन पाहणी केली. त्यानुसार जालना, परतूर आणि मंठा या तिन्ही तालुक्यांच्या मध्यभागी असलेल्या डोंगरावर उपक्रम राबवण्यात आले. यामुळे हे सर्व प्रस्ताव तयार केले, महाराष्ट्र शासन आणि श्री. श्री. रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिविंग या संस्थेच्या माध्यमातून जालना परतूर आणि मंठा या तिन्ही तालुक्यातील मात्र एक दुसऱ्याला लागून असलेल्या या तिन्ही तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या डोंगरावर "माथा ते पायथा" हा पाणलोट विकासाचा प्रकल्प हाती घेण्यात आला.
या प्रकल्पामुळे शंभू सावरगाव, गुळखंड तांडा, वाई ,एदलापूर ,पांगरी,आदी दहा गावांना याचा फायदा होणार आहे. सुमारे दीडशे फूट उंच असलेल्या या डोंगररांगांवर एक २० मिटर लांब, एक मिटर रुंद, एक मिटर खोल अशा पद्धतीचे सुमारे ६० किलोमीटर चर खोदण्यात आले आहेत. पोकलनच्या माध्यमातून खोदण्यात आलेल्या या चरावर श्रमदान करून दगडी बांध घालण्यात आले आहेत. यासोबत रस्त्याच्या कडेला असलेले नाले यांचेही खोलीकरण करून रस्त्यापासून सुमारे पंधरा फूट खोल अशा पद्धतीचे नाले करून दर ७० फुटावर पाणी अडविण्यात आले आहे. नांगरतास नदीचे पुनरुज्जीवन करून तिथे मोठ्या प्रमाणात जलसाठा होईल अशा पद्धतीची ही कामे करण्यात आले आहेत.