जालना - शहराचे ग्रामदैवत असलेल्या आनंदी स्वामी महाराजांची पालखी सोहळ्यास सुरूवात झाली असून, पालखी सोहळ्यातील गर्दीवर नियंत्रण ठेण्यासाठी अनेक सेवा संस्था पुढे सरसावल्या आहेत.
सकाळी आठ वाजेच्या सुमारास मंदिराबाहेर पालखी गेल्यानंतरही महाराजांच्या पादूकांचे दर्शन घेण्यासाठी येथे रांग लागलेली असते. अडीच ते तीन तास या रांगेमध्ये उभे राहिल्यानंतर श्रींच्या पादुकांचे दर्शन होते. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध संस्था काम करत आहेत. यामध्ये अनिरुद्ध बापू उपासना केंद्र या आध्यात्मिक संस्थेसोबतच शासकीय संस्थेमधील म्हणजेच भारत स्काऊट अँड गाईड चे विद्यार्थी देखील येथे आपली सेवा समर्पित करीत आहेत. या दोघांच्या मदतीमुळे मंदिर प्रशासनाचा मोठा ताण कमी झाला असून भाविकांनाही शांततेत दर्शन मिळत आहेत.