ETV Bharat / state

पुन्हा सत्ता आल्यावर घुसखोरांना घरात घुसून बाहेर काढणार - अमित शहा - congress

आमचे सरकार घुसखोरांना जशास तसे उत्तर देईल, असा इशारा देत मोदी सरकार हे सैन्याचे सरकार असल्याचे ते म्हणाले.

अमित शहा, जालना
author img

By

Published : Apr 19, 2019, 8:44 AM IST

जालना - भाजपाची सत्ता आल्यानंतर घुसखोरांना घरात घुसून बाहेर काढू. हा भाजपचा जाहीरनामा आहे. तसेच मोदी सरकारने सर्वात मोठे केलेले काम म्हणजे देशाला सुरक्षितता दिली आहे. असे असताना राहुल बाबा पाकिस्तान सोबत इलू-इलू करीत आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी जालना येथे केली. जालना लोकसभा मतदारसंघाचे भाजप-सेना युतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

अमित शहा, जालना

आपल्या २५ मिनिटांच्या भाषणात शाह यांनी मोदी सरकारने केलेल्या कामाचा पाढा वाचला. त्याचसोबत विरोधी पक्षांवरही कडाडून टीका केली. काँग्रेसकडून देशात ५५ वर्षात गरिबी हटवली गेली नाही. हेच काम मोदींनी 55 महिन्यात करून दाखविले आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या काळात राबवल्या गेलेल्या सर्व योजनांचा पाढा वाचून दाखवला. शरद पवार यांच्यावरही टीक करत, ते आम्हाला विचार हिशोब विचारत आहेत तर त्यांनी त्यांच्या काळातील हिशोब जनतेला द्यावा, असे आव्हाहनही शहांनी पवारांना केले.

पुलवामा हल्ल्याचाही उल्लेख करत काँग्रेसला पाकिस्तानबद्दल सहानुभुती असल्याचा आरोप त्यांनी केला. आमचे सरकार घुसखोरांना जशास तसे उत्तर देईल, असा इशारा देत मोदी सरकार हे सैन्याचे सरकार असल्याचे ते म्हणाले. काश्मीर मुद्द्यावर बोलताना त्यांनी ओमर अब्दुल्ला, राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. या सर्वांना दहशतवाद्यांबद्दल सहानुभुती असल्याचे ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष माधवी नाईक, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, भाजपाचे शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे आदींची उपस्थिती होती.

Intro:भाजपाची सत्ता आल्यानंतर घुसखोरांना घरात घुसून बाहेर काढू हा भाजपचा जाहीरनामा आहे तसेच मोदी सरकारने सर्वात मोठेकेलेलं काम म्हणजे देशाला सुरक्षितता दिली आहे .असे असताना राहुल बाबा पाकिस्तान सोबत इलू इलू करीत आहे. अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिनांक 18 रोजी जालना येथे केली. जालना लोकसभा मतदारसंघाचे भाजप-सेना युतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

Body:आपल्या पंचवीस मिनिटांच्या भाषणात शाह यांनी मोदी सरकारने केलेल्या कामाचा पाढा वाचला . त्याच सोबतविरोधी पक्षांवर ही ही कडाडून टीका केली. ते म्हणाले की काँग्रेसचे राहुल बाबा आता गरिबी हटवायला निघाले आहेत. मात्र मागील पाच पिढ्या ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू ,इंदिरा गांधी, राजीव गांधी ,सोनिया गांधी, आणि मनमोहन सिंग यांनी देखील गरिबी हटावचा नारा दिला होता. आता राहुल बाबा देत आहेत गेल्या पंचावन्न वर्षांमध्ये गरिबी हटविण्याच्या नावाखाली या सरकारने राज्य केले मात्र गरिबी हटली नाही. हेच काम मोदींनी पंचावन्न महिन्यात करून दाखविले आहे .ते कसे केले हे सांगत असताना शहा म्हणाले की सात करोड गरीब महिलांना गॅस सिलेंडर चे वाटप केले. आठ करोड गरिबांना शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिले .अडीच करोड गरिबांना घरे दिली. दोन करोड 35 लाख लाख लोकांच्या घरामध्ये विज पोहोचवली. एवढेच नव्हे तर आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पन्नास करोड गरीब जनतेला दवाखान्याच्या खर्चातून मुक्ती दिली. तसेच 480 करोड रुपये पिक विमा देण्याचे काम सरकारने केले आहे. कामाची यादी जर वाचायला लागलो तर दोन दिवस जातील. मात्र शरद पवार आम्हाला विचार हिशोब विचारत आहेत. त्यांनी त्यांच्या काळातील हिशोब जनतेला द्यावा असे आवाहनही शहा यांनी केले .
काँग्रेस घरांवर टीका करताना शहा पुढे म्हणाले की सोनिया गांधी, मनमोहन यूपीएचे सरकार होते त्यावेळी पाकिस्तानातून आलिया, मालिया, जामिया ,असे लोक देशांमध्ये घुसखोरी करीत होते, मात्र त्यांना कोणीही ही विचारत नव्हते. अशा परिस्थितीत पुलवामा मध्ये झालेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले त्यावेळी देश शोकसागरात बुडाला होता. आणि सर्वांचे लक्ष मोदी कोणता निर्णय घेतात याकडे लागले होते. त्याच वेळी सर्जिकल स्ट्राइक करणे शक्य नव्हते कारण पाकिस्तानने सीमावर्ती भागात सैन्य जमा केले होते. अशावेळी मोदींनी शहीद जवानांच्या तेराव्या दिवशी वायुसेनेला आदेश देऊन एयर स्ट्राईक केले. त्यामध्ये 400 दहशतवादी ठार झाले आणि आणि याचा शोक आणि दुःख फक्त दोनच ठिकाणी करण्यात आले, एक म्हणजे पाकिस्तानात आणि दुसरे म्हणजे राहुल बाबा अंड कंपनीच्या कार्यालयात .राहुल बाबा च्या कार्यालयात शोक व्यक्त करण्याचे कारण काय? ठार झालेले दहशतवादी का हे का राहुल बाबाच्या चुलतभाऊ होते का ?असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला .त्यापुढे जाऊन शहा म्हणाले की गांधी घराण्याचे गुरु पित्रोदा यांनी आटापिटा करून दहशतवाद्यांनी केलेला गोळीबार हा लहान मुलांचा खोडसाळपणा आहे असे समजून दुर्लक्ष करायला पाहिजे होते.आम्ही तसे केले असते तर जनतेने आम्हला कधीही माफ केलं नसतं.
त्यामुळे काँग्रेस पक्षाने आणि दहशतवाद्यांनी हे लक्षात घ्यावे ही पाकिस्तान कडून एक गोळी आली तर इकडून गोळे जातील. काश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य घटक आहे यासंदर्भात ओमर अब्दुल्ला यांनी नुकतेच एक विधान केलेआहे. या विधानात ते म्हणाले की काश्मीरमध्ये दुसरा पंतप्रधान होणार आहे. एका देशात दोन पंतप्रधान कसे? यासंदर्भात मागील दहा दिवसांपासून मी राहुल गांधी आणि शरद पवारांना विचारत आहे की तुम्ही ओमर अब्दुल्ला यांच्या मताशी सहमत आहात का मात्र एकही उत्तर मिळत नाही. त्याच सोबत राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने भाजपा सरकारने देशात घुसलेल्या आतंकवाद्यांना शोधून काढण्याचे काम सुरू केले आहे .मात्र यांचा पुळका गांधी आणि पवार घराण्याला आला असून घरातून बाहेर काढल्यानंतर हे गरीब कुठे जातील ?कसे राहतील ?यासोबत मानवी हक्काचा ही मुद्दा उपस्थित केला जात आहे. म्हणजे यांना जवान शहीदK होण्याशी काही देणेघेणे नाही. मात्र आतंकवाद्यांच्या राहण्याची,त्यांच्या खान्या पाण्याची पडली आहे. अशी टीकाही अमित शहा यांनी केली .
यावेळी व्यासपीठावर भाजपाच्या महिला आघाडीचे अध्यक्ष माधवी नाईक, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर ,आमदार नारायण कुचे ,आमदार संतोष दानवे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर ,भाजपाचे शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे आदींची उपस्थिती होती.

सभेचे विजवल आणि भाषण या पूर्वी देखील मोजोवरून पाठवले आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.