जालना - अंबड पोलीस ठाण्याचे तत्कालीन वादग्रस्त पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांच्या विरुद्ध वाळू माफियांना अभय दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कारवाई करण्य बाबतच्या याचिकेवर बुधवारी अंबड न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने या अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे अशा प्रकारे वाळू माफियांना अभय देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
वाळू माफियांना अभय देणाऱ्या पोलिसांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करा, अंबड न्यायालयाचे आदेश - अंबड न्यायालयाचा निकाल
अंबड पोलीस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक पांडुरंग माने यांनी ५ मार्च २०१८ला तस्करीची वाळू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे एक वाहन(हायवा) पकडून कारवाई करण्यासाठी ताब्यात घेतले होते. मात्र पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांनी मोबाईल वरून माने यांना हायवा सोडून देण्यास सांगितले होते.
वाळू माफियांना अभय देणाऱ्या पोलिसांविरुद्ध फौजदारी