ETV Bharat / state

पारध येथे भारत निर्माण योजनेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, गावकऱ्यांचे उपोषण - भारत निर्माण योजना पारध

जालन्यातील पारध गावमध्ये भारत निर्माण योजनेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी आता गावकरी उपोषणाला बसले आहेत. याप्रकरणी ग्रामस्थांकडून कॉन्ट्रॅक्टर, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

Allegation corruption Bharat Nirman Yojana Paradh
भारत निर्माण योजना पारध
author img

By

Published : Mar 2, 2022, 7:42 PM IST

जालना - जालन्यातील पारध गावमध्ये भारत निर्माण योजनेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी आता गावकरी उपोषणाला बसले आहेत. याप्रकरणी ग्रामस्थांकडून कॉन्ट्रॅक्टर, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

माहिती देताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख आणि उपसरपंच

हेही वाचा - SPECIAL : अखेर गोरखा वाॅचमनचा मुलगा युक्रेनहून जालन्यात परतला, कुटुंबात जल्लोष... पाहा व्हिडिओ

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 1 कोटी 84 लाख रुपये मंजूर करण्यात आले. यापैकी 1 कोटी 40 लाख रुपये खर्चून भारत निर्माण योजना राबवण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून स्वतंत्र विहीर, पाईपलाईन, पाण्याची टाकी, गावातील अंतर्गत पाईपलाईनचे काम करण्यात आले. पण ही सर्व कामे अर्धवट आणि नियम डावलून करण्यात आली असून सर्व कामे निकृष्ठ दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

पाणीपुरवठ्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने गावातील पाणीप्रश्न अजूनही कायम आहे. पाईपलाईनसाठी निकृष्ठ दर्जाचे पाईप वापरण्यात आले असून नियमानुसार पाईपलाईनची खोली करण्यात आली नसल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी गावातील महिलांना हातपंपावरून पाणी भरण्याची वेळ आली आहे. गावातील पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी सरपंच, उपसरपंचांसह ग्रामस्थांनी केली आहे.

पारधमध्ये राबवण्यात आलेल्या भारत निर्माण योजनेच्या कामाची तातडीने चौकशी करून कॉन्ट्रॅक्टर, पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी यांनी योजनेचे काम अर्धवट सोडून शासनाकडून हडप केलेला निधी वसूल करण्यात यावा. पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

या मागणीसाठी पारध ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गावातच 3 दिवसांपासून उपोषणाचे हत्यार उपसले आहे. यातील 3 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. जर जबाबदार अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई झाली नाही तर, आणखी आंदोलन तीव्र करण्याचा ईशारा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

हेही वाचा - Jalna Students Return From Ukraine : जालन्यातील तीन विद्यार्थी मायदेशी परतले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.