ETV Bharat / state

जालन्यात डॉक्टरवरील हल्ल्याचा दुचाकी रॅली काढून निषेध - जालना बातम्या

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बंगालच्या डॉक्टरांचा गेल्या ११ जूनपासून संप सुरू आहे. त्याच्या समर्थनार्थ देशातील डॉक्टरांनी एक दिवसाचा संप पुकारण्याचे आवाहन आयएमएने केले होते. त्यानुसार हा बंद पुकारण्यात आला आहे.

जालना
author img

By

Published : Jun 17, 2019, 4:48 PM IST

जालना - डॉक्टरांवरील होत असलेल्या हल्ल्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जालना शाखेच्यावतीने रॅली काढून निषेध करण्यात आला. शहरातील भोकरदन नाका परिसरात असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यालयापासून सकाळी 11 वाजता डॉक्टरांनी दुचाकीवरून रॅली काढली. बस स्थानक, मामा चौक, सराफामार्गे शिवाजी पुतळा आणि परत मामा चौकात येऊन समारोप झाला.

जालना

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बंगालच्या डॉक्टरांचा गेल्या ११ जूनपासून संप सुरू आहे. त्याच्या समर्थनार्थ देशातील डॉक्टरांनी एक दिवसाचा संप पुकारण्याचे आवाहन आयएमएने केले होते. त्यानुसार हा बंद पुकारण्यात आला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर कल्पना भन्साली यांनी डॉक्टरांवरील होणारे हल्ले हे चिंताजनक आहेत आणि त्याचा संघटनेच्यावतीने निषेध करण्यात येणार असून पुढील चोवीस तासांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती दिली.

तसेच या संघटनेच्या माजी अध्यक्ष तथा सदस्य डॉक्टर अनुराधा राख यांनी संपादरम्यान अत्यावश्यक असलेल्या रुग्णांना सेवा पुरविली जाईल, असे सांगून रात्री बारा वाजतादेखील डॉक्टर सामान्यांच्या कामासाठीच उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांच्यावरील होणाऱ्या हल्ल्याची शासनाने गंभीर दखल घेऊन यापुढे अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या रॅलीमध्ये जालना आयएमएचए सचिव डॉ. उमेश कळवा यांच्यासह डॉक्टर साबू,डॉक्टर काबरा, डॉक्टर श्रीमंत मिसाळ, डॉक्टर भन्साली, डॉक्टर राजन उढान आदींची उपस्थिती होती. जालना शहरामध्ये 'आयॲमए'कडे नोंदणी असलेले 280 डॉक्टर्स आहेत.

Intro:डॉक्टरांवरील होत असलेल्या हल्ल्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जालना शाखेच्यावतीने रॅली काढून निषेध करण्यात आला.

Body:शहरातील भोकरदन नाका परिसरात असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यालयापासून सकाळी 11 वाजता डॉक्टरांनी दुचाकीवरून रॅली काढली होती .बस स्थानक ,मामा चौक, सराफा, मार्गे शिवाजी पुतळा आणि परत मामा चौकात येऊन समारोप झाला. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्षा डॉक्टर कल्पना कल्पना भंसाली यांनी ,डॉक्टरांवरील होणारे हल्ले हे चिंताजनक आहेत आणि त्याचा संघटनेच्यावतीने निषेध करण्यात येणार असून पुढील चोवीस तासांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच या संघटनेच्या माजी अध्यक्ष तथा सदस्य डॉक्टर अनुराधा राख यांनी संपादरम्यान अत्यावश्यक असलेल्या रुग्णांना सेवा पुरविली जाईल, असे सांगून रात्री बारा वाजता देखील डॉक्टर सामान्यांच्या कामासाठीच उपलब्ध असतात त्यामुळे त्यांच्यावरील होणाऱ्या हल्ल्याची शासनाने गंभीर दखल घेऊन यापुढे अशी परिस्थिती ती उद्भवणार नाही ही याची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
या रॅलीमध्ये जालना आय एम एच ए सचिव डॉ उमेश कळवा यांच्यासह डॉक्टर साबू ,डॉक्टर काबरा, डॉक्टर श्रीमंत मिसाळ, डॉक्टर भन्साली, डॉक्टर राजन उढान आदींची उपस्थिती होती जालना शहरांमध्ये आय ॲम एकडे नोंदणी असलेले 280 डॉक्टर्स आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.