जालना - जिल्ह्यात आणि विशेषत: शहरात वाढणारा कोरोना बाधित रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता जालना शहरात असलेल्या कुंडलिका नदीवरील चारही पूल बंद करण्यात येणार आहेत. नवीन जालना भागातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, याचा प्रादुर्भाव जुना जालना भागातील नागरिकांवर होऊ नये, म्हणून रुग्णवाहिकांव्यतिरिक्त अन्य कोणतेही वाहने या पुलावरून जाणार नाही. अत्यावश्यक असल्यास बायपास चा वापर करावा लागणार आहे. या निर्णयामुळे कोरोनाला आळा बसेल असे मत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी घेतलेली पत्रकार परिषद नवीन जालना वसाहतीत असलेली दाट वस्ती लक्षात घेता कोरोनाची संख्या वाढत असल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तवला आहे. यामुळे हा संसर्ग वाढू नये, तसेच गर्दीपासून अलिप्त ठेवण्यासाठी प्रशासनाने हे पूल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या जालन्यातील नागरिक हे कुठल्याही खरेदीसाठी नवीन जालण्यात जात-येत असतात. याच भागात असलेल्या दाना बाजार, सिंधी बाजार, कादराबाद, फुले मार्केट, मंगळ बाजार ,इथे प्रचंड गर्दी असते. या गर्दीला आळा घालण्यासाठी हे पूल बंद करण्यात येणार आहेत. यावेळी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपआपल्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांबद्दल माहिती दिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आता टेलीमेडिसीन आणि मानसोपचार तज्ञांचा सल्ला ही देण्यात येणार आहे. जेणेकरून रुग्णांना घरबसल्या त्यांच्या आरोग्याची काळजी घेता येईल. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे म्हणाले की, कोरोना हा आजार संपणारा नाही मात्र नागरिकांनी स्वयंशिस्त पाळल्यास हा आजार टाळता येतो.जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेला, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य जीपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड नोडल ऑफिसर डॉ.कडले, डॉ जगताप, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा - 'बा विठ्ठला...! देशासह राज्यावरील कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे'