जालना - जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथे गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ३ हायवा आणि दोन ट्रॅक्टरसह वाळू पकडून सुमारे सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रातून आज भल्या पहाटे वाळूची अवैधरीत्या चोरी केल्या जात असल्याची माहिती गोंदी पोलिसांना मिळाली होती. गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हनुमंत वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.