ETV Bharat / state

जालन्यात रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यात ८ शेळ्यांचा मृत्यू, ग्रामस्थांनी ३ कुत्र्यांना केले ठार - रानटी कुत्रा

तालुक्यातील खरपुडी गावच्या शिवारात शेतामध्ये बांधलेल्या शेळ्यांवर रानटी कुत्र्यांनी हल्ला केल्याने ८ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे.

जालन्यात रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यात ८ शेळ्यांचा मृत्यू, ग्रामस्थांनी ३ कुत्र्यांना केले ठार
author img

By

Published : May 15, 2019, 11:16 AM IST

जालना - बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, ग्रामस्थांनी ३ कुत्र्यांना कोंडून ठार मारले, तर यातील एक कुत्रा पळून गेला आहे.

शरद रामकिसन शेजुळ (खरपुडी) यांचे गावापासून जवळच शेत आहे. या शेतामध्ये शेळ्यांसाठी त्यांनी शेड तयार केले आहे. या शेडच्या चारही बाजूने तारांचे संरक्षक कुंपण आहे. या कुंपणामध्ये शेळ्यांसाठी आणखी एक कुंपण घातले आहे. हे दोन्ही कुंपण तोडून ४ रानटी कुत्र्यांनी आत प्रवेश करून शेळ्यांच्या नरडीला चावा घेतला, काहींचे पाय तोडले त्यामुळे शेळ्या ओरडू लागल्या, त्या दरम्यान शेळ्यांचा आवाज ऐकून बाजूला असलेल्या शेजुळ यांच्या नातेवाईकांनी शेडकडे धाव घेतली. त्यावेळी ही ४ कुत्री शेळ्यांना चावा घेताना दिसली. त्यावेळी कुत्र्यांची संख्या पाहता सहकाऱ्यांनी दार बंद करून कुत्र्यांना आतमध्ये कोंडले.

जालन्यात रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यात ८ शेळ्यांचा मृत्यू, ग्रामस्थांनी ३ कुत्र्यांना केले ठार

यानंतर ग्रामस्थ त्या कुत्र्यांना मारण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, ही कुत्री ग्रामस्थांच्या अंगावर धावून येत होती. शेवटी त्यांना विजेचा शॉक देऊन मारावे लागले. यातील ४ कुत्र्यांपैकी ३ कुत्र्यांना ठार मारण्यात आले असून एक कुत्रा पळून गेला आहे. मागील १५ दिवसांमध्ये या परिसरातील गाईंची वासरे, शेळ्या, लहान जनावरे, अशा १५ जनावरांना या कुत्र्यांनी मारले. इतर जनावरांचे कान तोडणे, पायाला चावा घेणे, अशा प्रकारच्या सुमारे ५० जनावरांना या रानटी कुत्र्यांनी जखमी केले. या कुत्र्यांची परिसरात दहशत वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे, त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Intro:जालना तालुक्यातील खरपुडी गावच्या शिवारात शेत वस्तीत बांधलेल्या शेळ्यांवर रानटी कुत्र्यांनी पहाटे चार वाजेच्या सुमारास हल्ला करून आठ शेळ्यांच्या फडशा पाडला. दरम्यान या कुत्र्यांना ग्रामस्थांनी कोंडून तीन कुत्र्यांना ठार मारले तर एक कुत्रा पळून गेला.

Body:खरपुडी येथील शेतकरी शरद रामकिसन शेजुळ यांचे खरपुडी पासून जवळच शेत आहे या शेतामध्ये शेळ्यांसाठी शेड केलेला आहे .शेडच्या चारही बाजूने तारांचे संरक्षक कुंपण आहे.आणि या कुंपणामध्ये शेळ्यांसाठी आणखी एक कुंपण घातले आहे. हे दोन्ही कुंपण तोडून चार रानटी कुत्र्यांनी सकाळी चार वाजेच्या सुमारास शेळ्या कोंडलेल्या ठिकाणी कुंपण वाकून प्रवेश केला.आणि शेळ्यांच्या नरडीला चावा घेतला,काहींचे पाय तोडले त्यामुळे शेळ्या ओरडू लागल्या, त्याच दरम्यान शेळ्यांचा आवाज ऐकून बाजूलाच असलेल्या शेजुळ यांच्या नातेवाईकांनी या शेड कडे धाव घेतली, त्यावेळी हे चार कुत्रे शेळ्यांच्या नरड्यात चावा घेताना दिसले ,मात्र कुत्र्यांची संख्या पाहता या सहकाऱ्यांनी दार बंद करून घेतले आणि कुत्र्यांना मध्ये कोंडले. त्यानंतर ग्रामस्थ येऊन या कुत्र्यांना मारण्याचा प्रयत्न करत होते ,मात्र कुत्रे या ग्रामस्थांच्या अंगावर धावून येत असल्यामुळे शेवटी त्यांना विजेचा शॉक देऊन मारावे लागले. चार कुत्र्यांपैकी तीन कुत्र्यांना ठार मारण्यात आले असून एक कुत्रा पळून गेला आहे .मागील पंधरा दिवसांमध्ये या परिसरातील गाईची वासरे ,शेळ्या ,लहान -लहान जनावरे अशी सुमारे 15 प्राणी या कुत्र्यांनी मारले आहेत ,तर मोठाले जनावरांची कानी तोडणे ,पायाला चावा घेणे ,अशा प्रकारच्या सुमारे पन्नास जनावरांना या रानटी कुत्र्यांनी जखमी केले .आहे या कुत्र्यांची परिसरात दहशत वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याचा बंदोबस्त करावा अशी मागणीही शेतकरी करीत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.