ETV Bharat / state

जालना जि. प. मधून मुख्यमंत्री सहायता निधीत १ कोटी ५ लाख रुपये - cm relief fund sbi cmp jalna

जिल्ह्यातील 1633 शाळांमधील 5,911 शिक्षक कर्मचाऱ्यांचे मे महिन्याच्या एक दिवसीय वेतन कपात करण्यात आली. त्याद्वारे हे पैसै जमा झाले आहेत. हे पैसे जमा करण्यासाठी प्रचलित पद्धतीने हे पैसै जमा होण्याला लागणारा महिनाभराचा विलंब लक्षात घेता ऑनलाईन CMP प्रणालीचा वापर करण्यात आला.

jalna zp
जालना जिल्हा परिषद
author img

By

Published : Jun 20, 2020, 6:29 PM IST

जालना - येथील जिल्हा परिषदेतून 1 कोटी 5 लाख 23 हजार 402 रूपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मे महिन्याच्या वेतनातून सर्व कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय वेतन हे कोरोना मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. 19 जूनला ते थेट मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आले. एसबीआय सीएमपी (कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट) या प्रणालीच्या माध्यमातून ते जमा करण्यात आले.

जिल्ह्यातील 1633 शाळांमधील 5,911 शिक्षक कर्मचाऱ्यांचे मे महिन्याच्या एक दिवसीय वेतन कपात करण्यात आली. त्याद्वारे हे पैसै जमा झाले आहेत. हे पैसे जमा करण्यासाठी प्रचलित पद्धतीने हे पैसै जमा होण्याला लागणारा महिनाभराचा विलंब लक्षात घेता ऑनलाईन सीएमपी (कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट) प्रणालीचा वापर करण्यात आला. जिल्हा परिषदेतील मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांचे मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण केली. त्यांना शिक्षणाधिकारी प्राथमिक कैलास दातखील यांचेही सहकार्य लाभले.

यात जिल्ह्यातील 1633 शाळांमधील 5,911 शिक्षक कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय वेतन कपाती करण्यात आली. या माध्यमातून १ कोटी ५ लाख २३ हजार ४०२ रूपये जमा झालेत. ते भारतीय स्टेट बँक सीएमपी (कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट) या प्रणालीद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आले.

जालना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शिक्षकांचे दरमहा वेतन एसबीआय सीएमपी (कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट) प्रणालीमार्फत जिल्हास्तरावरुन थेट शिक्षकांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते. गेल्या दिड वर्षापासून ही प्रक्रिया सुरु आहे.

जालना जिल्हा परिषदेचा प्रथम क्रमांक -

मुख्यमंत्री सहायता निधी संकलनातील प्रचलित पद्धतीला फाटा देत थेट जिल्हास्तरावर मदतनिधी रक्कम गैरशासकीय कपातीतुन वेगळी करण्यात आली. यानंतर भारतीय स्टेट बँक सीएमपी (कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट) या प्रणालीमार्फत थेट मुख्यमंत्र्यांच्या मदतनिधी खात्यामध्ये पैसे जमा करणारी जालना प्रथम जिल्हा परिषद ठरली आहे.

तसेच शालेय मुख्याध्यापकांचे बँक धनादेश/चलन भरणा करण्याचे परिश्रमातुनही मुक्तता झाली. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनास अधिकृतपणे अहवाल सादर केला जाणार आहे.

सदरील उद्दीष्टपुर्ती करण्यासाठी परिश्रम करणाऱ्या आणि सहकार्य लाभलेल्या सर्व शालेय मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण आणि वित्त विभागातील लेखा अधिकारी, कर्मचारी तसेच शालार्थ समन्वयक यांचे कौतुक होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.