ETV Bharat / state

भुसावळमध्ये लाचखोर वायरमन 'एसीबी'च्या जाळ्यात

विश्वनाथ सोमा बाविस्कर (वय ४८, छायादेवी नगर, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या वायरमनचे नाव आहे.

भुसावळमध्ये लाचखोर वायरमन 'एसीबी'च्या जाळ्यात
author img

By

Published : Jul 9, 2019, 3:36 AM IST

जळगाव - महावितरण कंपनीच्या भुसावळ येथील वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी लाच घेताना रंगेहात पकडले आहे. फेरफार केलेले वीज मीटर तपासणीला पाठवू नये, म्हणून मदत करण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच घेताना या वायरमनला अटक करण्यात आली आहे.

विश्वनाथ सोमा बाविस्कर (वय ४८, छायादेवी नगर, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या वायरमनचे नाव आहे. भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील 40 वर्षीय तक्रारदाराच्या घरातील मीटरमध्ये फेरफार असल्याचा आक्षेप महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेतला होता. ते मीटर तपासणीला पाठवू नये, म्हणून मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे वायरमन विश्वनाथ बाविस्कर याने ३ हजार रुपयांची लाच मागितली होती.

भुसावळमध्ये लाचखोर वायरमन 'एसीबी'च्या जाळ्यात

त्यानंतर तक्रादाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी सापळा रचून बाविस्कर याला तक्रारदारकडून ३ हजार रुपयांची लाच घेताना पंचांसमक्ष अटक केली. दरम्यान, मागील आठवडाभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यात झालेली ही तिसरी कारवाई आहे.

Intro:जळगाव
फेरफार केलेले वीज मीटर तपासणीला पाठवू नये म्हणून मदत करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेताना महावितरण कंपनीच्या भुसावळ येथील वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहात पकडले. विश्वनाथ सोमा बाविस्कर (वय ४८, छायादेवी नगर, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या वायरमनचे नाव आहे.Body:भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील ४० वर्षीय तक्रारदाराच्या घरातील मीटरमध्ये फेरफार असल्याचा आक्षेप महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेतला होता. ते मीटर तपासणीला पाठवू नये म्हणून मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे वायरमन विश्वनाथ बाविस्कर याने ३ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रादाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी सापळा रचून बाविस्कर याला तक्रारदारकडून ३ हजार रुपयांची लाच घेताना पंचांसमक्ष अटक केली.Conclusion:दरम्यान, मागील आठवडाभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यात झालेली ही तिसरी कारवाई आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.