ETV Bharat / state

'साले सेटींग करतात'... गुलाबराव पाटलांची घसरली जीभ! - gulabrao patil controversial remark

माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर उमेदवार होते. त्यांना मी सांगितले असते तुम्ही लोकसभा लढा, मी विधानसभा लढतो. पण, मी युती धर्माचे पालन केले. गद्दारी आमच्या रक्तात नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

jalgaon
मंत्री गुलाबराव पाटील
author img

By

Published : Jan 20, 2020, 1:26 PM IST

जळगाव - खान्देशची मुलुख मैदानी तोफ म्हणून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची ओळख आहे. यावेळी पाटील यांनी जिल्ह्यातील भडगाव येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात विरोधकांवर टीकेची तोफ डागताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विधानसभा निवडणुकीतील बंडखोरीच्या मुद्द्यावरून भाजपच्या नेत्यांवर आगपाखड करताना पाटील यांची जीभ घसरली. 'सालेहो सेटींग करतात, तेही आमचीच मते खाऊन, भोगावे लागेल इथेच', असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटील

भडगाव येथे एक छोटेखानी राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला गुलाबराव पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात आपल्या भाषणात त्यांनी विविध मुद्द्यांवर मत मांडले. युतीच्या मुद्द्यावर बोलताना गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी आमची भाजपसोबत युती होती. भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्यासाठी आम्ही अंग झटकून मेहनत केली. रात्रीचा दिवस केला. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने युती धर्माचे पालन केले नाही. आमच्या वाट्याला असलेल्या मतदारसंघात बंडखोर पेरले. साले सेटींग करतात. तेही आमचीच मते खाऊन. सेटींग करायची असती तर मी लोकसभा निवडणुकीत केली असती. माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर उमेदवार होते. त्यांना मी सांगितले असते तुम्ही लोकसभा लढा, मी विधानसभा लढतो. पण, मी युती धर्माचे पालन केले. गद्दारी आमच्या रक्तात नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले. कसेही असो आता आम्ही सत्तेत असताना विरोधक म्हणताहेत की आमचे सरकार फार काळ टिकणार नाही. मात्र, कसेही असो आम्ही आता सत्तेत आहोत. आमचा मुख्यमंत्री आहे, असा चिमटा देखील गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या नेत्यांना काढला.

हेही वाचा- जो आडवा येईल, त्याला पाणी पाजणार - गुलाबराव पाटील

Intro:जळगाव
खान्देशची मुलुख मैदान तोफ म्हणून राज्यभर ओळख असलेले शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विधानसभा निवडणुकीतील बंडखोरीच्या मुद्द्यावरून भाजपच्या नेत्यांवर आगपाखड करताना त्यांची जीभ घसरली. 'सालेहो सेटींग करतात... तेही आमचीच मते खाऊन... भोगावे लागले इथेच', असे वक्तव्य त्यांनी केले असून या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.Body:भडगाव येथे एक छोटेखानी राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला गुलाबराव पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमात आपल्या भाषणात त्यांनी विविध मुद्द्यांवर मत मांडले. युतीच्या मुद्द्यावर बोलताना गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत वेळी आमची भाजपसोबत युती होती. भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्यासाठी आम्ही अंग झटकून मेहनत केली. रात्रीचा दिवस केला. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने युती धर्माचे पालन केले नाही. आमच्या वाट्याला असलेल्या मतदारसंघात बंडखोर पेरले. साले सेटींग करतात. तेही आमचीच मते खाऊन. सेटींग करायची असती तर मी लोकसभा निवडणुकीत केली असती. माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर उमेदवार होते. त्यांना मी सांगितले असते तुम्ही लोकसभा लढा, मी विधानसभा लढतो. पण मी युती धर्माचे पालन केले. गद्दारी आमच्या रक्तात नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले.Conclusion:कसेही असो आता आम्ही सत्तेत-

विरोधक म्हणत आहेत की आमचे सरकार फार काळ टिकणार नाही. मात्र, कसेही असो आम्ही आता सत्तेत आहोत. आमचा मुख्यमंत्री आहे, असा चिमटा देखील गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या नेत्यांना काढला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.