- 8.30 am - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सहकुटुंब केले मतदान
जळगाव - जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. जिल्ह्यातील साडेतीन हजाराहून अधिक मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आज देखील पावसाची रिपरिप सुरू असल्याने सकाळच्या वेळी मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडलेले नाहीत.
पावसाच्या वातावरणामुळे मतदान प्रक्रियेवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. जळगाव शहरातील बहुसंख्य मतदान केंद्रांवर अद्यापही तुरळक मतदार दिसून येत आहेत.
जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेसाठी 16 हजार पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.