ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात

जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींच्या पाच हजार 154 जागांसाठी शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी पहिल्या टप्प्यात कामावर जाण्यापूर्वीच मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मतदान प्रक्रियेला सुरुवात
मतदान प्रक्रियेला सुरुवात
author img

By

Published : Jan 15, 2021, 9:53 AM IST

जळगाव - जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींच्या पाच हजार 154 जागांसाठी शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी पहिल्या टप्प्यात कामावर जाण्यापूर्वीच मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

जिल्ह्यात पाच हजार 154 जागांसाठी एकूण 13 हजार 847 उमेदवार रिंगणात आहेत. कोरोना काळात ग्रामीण भागात पहिली मोठी निवडणूक पार पडत असल्याने मतदारांमध्ये उत्साह आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य उपाययोजना करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर कोरोनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत मतदारांना मतदानासाठी आत सोडले जात आहे.

जिल्ह्यात दोन हजार 415 मतदान केंद्रे
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात दोन हजार 415 मतदान केंद्रे आहेत. त्यावर 13 हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महसूल प्रशासनासह शिक्षकांचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 20 हजार 264 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यात 288 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते, तर 19 हजार 976 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. माघारीच्या दिवशी सहा हजार 129 उमेदवारांनी माघार घेतली होती. तर जिल्ह्यातील 93 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

मतदान प्रक्रियेला सुरुवात

पाच हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया ही निर्भय वातावरणात पार पडावी, त्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने पाच हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त जिल्हाभरात तैनात करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या 5 तुकड्यांसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस अधिकारी व कर्मचारीदेखील बंदोबस्तासाठी मागवण्यात आले आहेत.

हेही वाचा - शिवसेनेला वंदे मातरमचे वावडे का? हिंदुत्वापासून फारकत घेतल्याचा भाजपाचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.