ETV Bharat / state

मदतीच्या बहाण्याने मध्यप्रदेशातील महिलेवर भुसावळामध्ये बलात्कार - जळगाव जिल्हा बातमी

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात मध्यप्रदेशातील एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घडना घडली आहे. या प्रकरणी एका अज्ञात तरुणावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस नराधमाचा शोध घेत आहे.

बाजारपेठ पोलीस ठाणे
बाजारपेठ पोलीस ठाणे
author img

By

Published : Feb 23, 2021, 11:31 PM IST

Updated : Feb 24, 2021, 4:28 AM IST

जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ शहरात मध्यप्रदेशातील एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका नराधमाने मदतीचा बहाणा करत पीडित महिलेला दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेले. त्यानंतर मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला. सोमवारी (22 फेब्रुवारी) रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती देताना पोलीस अधीक्षक

काय आहे प्रकरण?

मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील एका 35 वर्षीय महिलेचे भुसावळ शहरातील महिलेसोबत वाद होते. या वादाची तक्रार घेऊन दोन्ही महिला सोमवारी सायंकाळी भुसावळातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात आल्या होत्या. या ठिकाणी पोलिसांनी दोघींची समजूत काढल्यानंतर हे प्रकरण मिटले होते. त्यानंतर मध्यप्रदेशातील महिला घरी जाण्यासाठी पोलीस ठाण्यातून बाहेर पडली. त्यावेळी एका 25 ते 30 वयोगटातील अनोळखी तरुणाने मदतीच्या बहाण्याने तिला आपल्या दुचाकीवर बसवले. नंतर निर्जनस्थळी नेऊन तिला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकारानंतर पीडित महिलेने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. त्यानंतर अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासणार

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पीडित महिला पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर जेथून दुचाकीवर बसली, त्याठिकाणी तसेच आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले जाणार आहे. या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याच्या मुसक्या आवळल्या जातील,अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

हेही वाचा - काकाच्या लग्नाला आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

Last Updated : Feb 24, 2021, 4:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.