जळगाव - जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे आर्टिकल 370 रद्द केल्याने पाकिस्तान बिथरला आहे. यामुळेच पाकिस्तानने कंधार विमान अपहरण प्रकरणातील आंतरराष्ट्रीय कुविख्यात दहशतवादी मौलाना मसूद अझहरची गुप्तपणे सुटका केली आहे, असा आरोप विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला आहे.
हेही वाचा - आपण यांना पाहिलंत का? यावल-रावेर मतदारसंघातील फलकांमुळे खळबळ!
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अझहर पाकिस्तानच्या कारागृहातच नसल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम जळगावात माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा - जळगावातील रेशन माफियांना रान मोकळे; रावेर, यावल प्रकरणाच्या चौकशीचीही धार बोथट
ते पुढे म्हणाले, पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद रोखण्यासाठी दबाव वाढला होता. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने मे महिन्यात मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर पाकिस्तानने मसूदला पकडून कारागृहात टाकल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता पाकिस्तानने त्याची गुप्तपणे सुटका केल्याची माहिती समोर आली आहे.