ETV Bharat / state

जळगावात तिहेरी अपघातात दोन जण गंभीर; ट्रकचालकासह क्लिनरला अटक

भरधाव ट्रकने एका दुचाकीला आणि ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये २ जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली आहे.

जळगावात तिहेरी अपघातात दोन जण गंभीर; ट्रकचालकासह क्लिनरला अटक
जळगावात तिहेरी अपघातात दोन जण गंभीर; ट्रकचालकासह क्लिनरला अटक
author img

By

Published : Dec 12, 2020, 7:06 AM IST

जळगाव - शहराबाहेर राष्ट्रीय महामार्गावर खोटेनगर परिसरातील आहुजा नगरजवळ दुचाकीला मागून जोरदार धडक देऊन एक मालवाहू वाहन समोरुन येणार्‍या ट्रकवर धडकले. शुक्रवारी दुपारी झालेल्या या तिहेरी अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये मालवाहू वाहनवारील चालक अशोक सुकदेव रोकडे रा. पिंप्राळा आणि दुचाकीस्वार पंढरी नामदेव नन्नवरे(रा. बांभोरी )यांचा समावेश आहे. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून ट्रकसह चालक आणि क्लिनरला ताब्यात घेतले आहे. अपघात झाला याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक एरंडोलकडे जात होते. या पथकाने गाडीचा दरवाजा तोडून अडकलेल्या मालवाहू चालकाला तातडीने बाहेर काढले व शासकीय वाहनातून रुग्णालयात हलविले. वेळीच रुग्णालयात पोहचल्याने मालवाहू वाहनावरील चालक रोकडे यांचे प्राण वाचले.

ओव्हरटेकच्या नादात दुचाकीला जोरदार धडक-

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एसटी परिवहन मंडळातील सेवानिवृत्त निरिक्षक पंढरी नामदेव नन्नवरे (रा. बांभोरी) यांचे जळगाव शहरातील आहुजानगर येथेही घर आहे. ते शुक्रवारी दुपारी बांभोरी येथून दुचाकीने (क्र. एम.एच. 19 ए डब्लू 9102 ) आहुजानगर येथे येत होते. त्यांच्या पाठोपाठ मालवाहू वाहन (एम.एच.19 एस.6757) ही जळगावकडे येत होते. मालवाहू वाहनाने ओव्हरटेकच्या नादात समोर नन्नवरे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यानंतर मालवाहू वाहने समोरुन पाळधीकडे जात असलेल्या (युपी 72 एटी.3565) ट्रकवर धडकला. जोरदार धडकेमुळे दुचाकीवरुन नन्नवरे हे फुटबॉलसारखे उडून रस्त्यालगत असलेल्या झाडाझुडपांमध्ये पडले. तर त्यांची दुचाकी ही ट्रकवर जावून लटकलेली होती. तर समोरील ट्रकला धडकल्याने मालवाहू वाहनाचा समोरुन चक्काचूर झाला होता.

वाहनाचा दरवाजा तोडून चालकाला काढले बाहेर-

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसहेड कॉन्स्टेबल विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, राजेंद्र पवार, प्रीतम पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील हे तपासासाठी एरंडोलकडे जात होते. त्याच्यासमोरच अपघाताची घटना घडल्याने त्यांनी मालवाहू वाहनाचा दरवाजा तोडून चालक अशोक रोकडे यास बाहेर काढले. तसेच ताब्यात असलेल्या शासकीय वाहनातून तत्काळ देवकर रुग्णालयात दाखल केले. कर्मचार्‍याच्या कर्तव्यपराणतेमुळे वेळीच रुग्णालयात दाखल झाल्याने मालवाहू वाहनावरील चालकाचे प्राण वाचविले आहे. चालक अशोक रोकडे गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. रोकडे यांचे बंधून चाळीसगाव येथे पोलीस कर्मचारी असून मदतकार्य करणार्‍या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांचे आभार मानले.

तालुका पोलिसांत गुन्हा दाखल-

अपघातावेळी बांभोरी येथील नागरिक जळगावकडे येत असतांना त्यांनी अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वार पंढरी नन्नवरे यांना ओळखले. त्यानंतर तत्काळ त्यांना रिक्षातून शहरातील अपेक्स या रुग्णालयात दाखल केले. त्यांचीही प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत. अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच काही काळासाठी वाहतूक खोळंबली होती. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त वाहने महामार्गावरुन बाजूला केले. तसेच वाहने सुरळीत केली. याप्रकरणी तालुका पोलिसांनी ट्रकसह चालक तसेच क्लिनरला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.