ETV Bharat / state

डंपरच्या धडकेत दोघे जागीच ठार; जळगावच्या वाघळी येथील घटना - जळगावात डंपरच्या धडकेत दोघे ठार

पीओपीचे बांधकाम कामगार असलेले मोहम्मद अली व शमीम शाह हे दोघेजण दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कामानिमित्त कजगाव येथे निघाले होते. कजगाव येथे जात असताना भडगाव रस्त्यावर वाघळी गावालगतच्या भैरवनाथ मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या डंपरने धडक दिली. यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

two died in an road accident
डंपरच्या धडकेत दोघे जागीच ठार
author img

By

Published : May 31, 2020, 7:38 PM IST

जळगाव - भरधाव डंपरने धडक दिल्याने दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाच्या भैरवनाथ मंदिराजवळ ही घटना घडली. मोहम्मद शाकीर अली जाकीर अली (वय २८) आणि शमीम शाह (वय २६) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. हे दोघेही मुळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी होते.

पीओपीचे बांधकाम कामगार असलेले मोहम्मद अली व शमीम शाह हे दोघेजण दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कामानिमित्त कजगाव येथे निघाले होते. कजगाव येथे जात असताना भडगाव रस्त्यावर वाघळी गावालगतच्या भैरवनाथ मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या डंपरने धडक दिली. यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचा चालक पसार झाला. याप्रकरणी डंपर चालकाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीओपी कामगार असलेले मोहम्मद अली व शमीम शाह हे मुळचे उत्तर प्रदेशातील गौंडा येथील रहिवासी होते. गेल्या पाच वर्षांपासून ते चाळीसगाव येथे रोजगारासाठी आलेले होते. शहरातील हंस थिएटर लगतच्या रहेमान नगर भागात ते राहत होते. कजगाव येथे पीओपीचे काम मिळाल्याने त्यासाठी ते कजगाव येथे जात होते. दरम्यान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.