ETV Bharat / state

जळगाव : ट्रक व काळी-पिवळीचा भीषण अपघात ; 9 ठार तर 11 जण जखमी - road accident in Jalgaon

एरंडोल शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर ट्रक आणि काळी पिवळीचा भीषण अपघात झाला आहे. यात 9 प्रवासी ठार झाले असून ११ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, या अपघातात 4 वर्षीय बालिका आश्चर्यकारकरित्या बचावली आहे.

जळगावमध्ये ट्रक-कारचा भीषण अपघात
जळगावमध्ये ट्रक-कारचा भीषण अपघात
author img

By

Published : Dec 23, 2019, 4:30 PM IST

Updated : Dec 24, 2019, 10:25 AM IST

जळगाव- जिल्ह्यातील एरंडोल शहराजवळ ट्रक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळीत झालेल्या भीषण अपघातात काळी पिवळीतील 9 प्रवासी ठार झाले आहेत. तर अन्य 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात ठार झालेल्या 9 जणांपैकी 7 जणांची ओळख पटली आहे. तर अन्य दोघांची ओळख पटलेली नाही. स्टेअरिंग व्हीलचा एक्सेल तुटल्यामुळे अनियंत्रित झालेला ट्रक काळी पिवळीतील प्रवाशांवर काळ बनून आदळला. या अपघातात सुदैवाने एक 4 वर्षीय बालिका आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. दरम्यान, या भीषण अपघातानंतर अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

एरंडोलजवळ ट्रक व काळी-पिवळीचा भीषण अपघात

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर एरंडोल शहराजवळ आज (सोमवारी) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. धुळ्याकडून भरधाव वेगाने येणारा (एम एच 15 जी 8474) क्रमांकाच्या ट्रकचा अचानक स्टेअरिंग व्हीलचा एक्सेल तुटल्यामुळे ट्रक अनियंत्रित झाला. हा ट्रक समोरून येणाऱ्या (एम एच 19 वाय 5207) क्रमांकाच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळीवर जोरात आदळला. या अपघातात काळी पिवळीतील तब्बल 9 प्रवासी ठार झाले. तर अन्य 11 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर रस्त्याच्या कडेला मृतदेहांचा अक्षरशः खच पडला होता. ट्रकची धडक एवढी भयंकर होती की त्यामुळे काळी पिवळीचा चुराडा झाला होता. ट्रकच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर अन्य वाहन चालकांनी आपली वाहने थांबवून मदतकार्य सुरू केले. काळी पिवळीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढून त्यांना मिळेल त्या वाहनाने तत्काळ एरंडोल शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. त्यानंतर गाडीत अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात स्थळाचे दृश्य हृदय हेलवणारे होते.

अपघाताची माहिती मिळताच एरंडोल पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली होती. प्रवासी वाहतूक करणाऱ्या या काळी पिवळी गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत असल्याचे अपघातानंतर समोर आले आहे.

अपघातातील मृतांची नावे -
1) प्रसन्ना निवृत्ती वंजारी
2) निवृत्ती प्रभाकर वंजारी
3) परमेश्वर नाना जाधव
4) नितीन सोनार
5) काशिनाथ शंकर पाटील
6) उज्ज्वला निवृत्ती वंजारी
7) भानुदास माधव जाधव

अपघातातील जखमींची नावे -
1) नरेंद्र भिका कासार
2) तुळसाबाई संजय महाजन
3) यासिन पठाण
4) मिठाराम सखाराम आरके
5) सोहेल शेख
6) पुष्पाबाई महाजन
7) गीताबाई रघुनाथ देशमुख
8) विजय आनंदा सोनवणे
9) राजेंद्र आनंदा सोनवणे
10) दुधभानसा खुसराम
11) फुसीबाई सुरेशकुमार

काळाची अशीही मेहरबानी-

18 पेक्षा जास्त प्रवासी असलेल्या चारचाकीच्या या अपघातात 4 वर्षीय बालिका सुदैवाने बचावली आहे. सिमरन दुधभानसा खुसराम (वय 4, रा. छिंदवाडा) असे बचावलेल्या बालिकेचे नाव आहे. सिमरन ही वडील दुधभानसा खुसराम व आजी फुसीयाबाई सुरेशकुमार यांच्यासोबत चारचाकीत होती. अपघातानंतर सिमरन मात्र सुखरुपपणे चारचाकीतून बाहेर पडली. अजाण असल्यामुळे वडील, आजीचा अपघात झाल्याची कल्पना देखील तिला आलेली नाही. नागरिकांनी मृत झालेल्या प्रवाशांचे मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तर जखमींना जळगावात हलवले आहे. नागरिकांनी सिमरन हिला एरंडोल पोलीस ठाण्यात नेऊन सोडले होते. वडील दुधभानसा यांच्याकडून काही नातेवाईकांची नावे, संपर्क क्रमांक मिळवून रात्री उशिरा सिमरनला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच अपघातात गंभीर जखमी झालेल्या तुळसाबाई महाजन यांची प्रकृतीही गंभीर आहे. त्यांच्या छातीवर गंभीर दुखापत झाली आहे.

डॉक्टरांच्या प्रयत्नांबरोबर नागरिकांचीही साथ-

या अपघातातील जखमींना उपचारासाठी जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींना घेऊन जिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णवाहिकेचा दरवाजा लॉक झाला होता. त्यामुळे रुग्णांना बाहेर काढता येत नव्हते. शेवटी ग्राइण्डरच्या सहाय्याने लॉक व दरवाजा तोडून रुग्णांना बाहेर काढण्यात आले. रुग्णांना रुग्णवाहिकेतून बाहेर काढता बरोबर तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. आवश्यक त्या चाचण्या करुन रुग्णांना वेगवेगळ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. डॉक्टर, नागरिकांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांमुळे लवकर उपचार होण्यास मदत झाली. दरम्यान, या प्रसंगी रुग्णालयात प्रचंड खळबळ उडाली होती. आमदार सुरेश भोळे यांच्यासह नगरसेवक प्रशांत नाईक, अशोक लाडवंजारी, अरविंद देशमुख, सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेत मदतकार्य केले.

Intro:जळगाव
भरधाव जाणारी ट्रक समोरून येणाऱ्या चारचाकीवर आढळल्याने भीषण अपघात झाला. ही घटना आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर एरंडोल शहराजवळ घडली. या अपघातात 4 ते 5 जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे.Body:ट्रकचा एक्सल तुटल्याने ती समोरून येणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकीवर आदळली. त्यात चारचाकीमधील 4 ते 5 जण ठार झाले तर इतर काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.Conclusion:जखमींना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी एरंडोल पोलीस दाखल झाले आहेत.

(सविस्तर बातमी थोड्याच वेळात)
Last Updated : Dec 24, 2019, 10:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.