जळगाव - जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या शनिवारी सातने वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ही 244 वर पोहचली आहे. प्रत्येक दिवशी कोरोना संक्रमित रुग्ण आढळत असल्याने जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. सद्यस्थितीत रुग्णसंख्या अडीचशेच्या उंबरठ्यावर पोहचल्याने मात्र आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 98 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल शनिवारी दुपारी प्राप्त झाले. यापैकी 91 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 7 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील पिंप्राळा, सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे तीन, भुसावळ येथील दोन, भडगाव येथील एक तसेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
शनिवारी पुन्हा 7 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 244 इतकी झाली असून, त्यापैकी 45 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत. तर 30 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
आतापर्यंत आढळलेले एकूण रुग्ण 244 -
अमळनेर 105 (कोरोनामुक्त 27)
भुसावळ 43 (कोरोनामुक्त 9)
जळगाव 50 (6 कोरोनामुक्त)
पाचोरा 20 (3 कोरोनामुक्त)
चोपडा 14 (शहर 9, अडावद 5)
मलकापूर 1
यावल 2 (फैजपूर 2 )
भडगाव 8 (शहर 6, 2 निंभोरा)
खामगाव 1
एकूण मृत्यू 30 -
जळगाव 4
अमळनेर 10
भुसावळ 9
चोपडा 3 (शहर 1, अडावद 2)
पाचोरा 4
हेही वाचा - जळगाव जिल्ह्यात 3 कोरोनाबाधितांची भर; एकूण रुग्णसंख्या झाली 235
हेही वाचा - जळगाव जिल्हा रुग्णालयाला मिळाले अजून 2 व्हेंटिलेटर्स; कोरोनाच्या लढ्यात खासगी कंपनीचे दातृत्त्व