जळगाव - शहरातील आव्हाणे शिवारात असलेल्या जळगाव महानगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. शहरातून निघणारा लाखो टन कचरा या ठिकाणी टाकला जातो. (Jalgaon Solid Waste Area news) मात्र, त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून निघणारा धूर आणि दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सततच्या त्रासामुळे काही नागरिकांनी तर आपले घरे देखील विक्रीला काढली आहेत. पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील अद्याप पर्यंत कुठलाही मार्ग निघाला नाही.
महापालिकेत जो तो आपली राजकीय पोळी भाजण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख निलेश पाटील यांनी केलायं. तसेच हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी न काढल्यास महापालिकेत ठिय्या मांडू असा इशारा देखील त्यांनी दिला. जळगाव महापालिकेत नगरसेवकांची पळवापळवी करण्यातच पदाधिकारी धन्यता मानत असतील तर शहराच्या विकासाकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न सहाजिकच नागरिकांच्या मनात उपस्थित होईल.
हेही वाचा - लता दीदींच्या स्मारकावरून वाद हे रोगट मानसिकतेचे लक्षण! रोखठोक'मधून भाजपवर हल्ला