ETV Bharat / state

केळीने भरलेला ट्रक उलटला; १० जण जखमी

केळी घेऊन जाणारा ट्रक गारखेडा गावाजवळ उलटला. यात दहा मजूर जखमी झाले आहेत.

उलटलेला ट्रक
उलटलेला ट्रक
author img

By

Published : Apr 4, 2020, 4:55 PM IST

जळगाव - शेतातून केळी भरून बाजारपेठेत निघालेला ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात ट्रकमधील 10 मजूर जखमी झाले आहेत. हा अपघात जामनेर तालुक्यातील गारखेडा गावाजवळ घडला. अपघातात ट्रकचेही नुकसान झाले आहे.

जामनेर तालुक्यातील मुंदखेडा येथून केळी भरून हा ट्रक गारखेडामार्गे जामनेरकडे येत होता. मुंदखेडा शिवारात शेतातून केळी भरलेला ट्रक (एम एच 19 बी एम 5051) गारखेडाकडे येत होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक गारखेडा गावाजवळ अचानक उलटला. त्यात किशोर नारायण चव्हाण (वय 21 वर्षे, रा. बोरगाव), हरीश सुपडू फेगडे (वय 38 वर्षे, रा. सावदा), प्रदीप अरविंद सोनवणे (वय 25 वर्षे, रा. फैजपूर), मुकेश संतोष गावंडे (वय 30,रा. इच्छापूर, मध्य प्रदेश), आकाश त्र्यंबक शेखर (वय 21 वर्षे), बापूनाथ मच्छिंद्र चव्हाण (वय 28 वर्षे), माणिक सखाराम शेखर (वय 41 वर्षे), परमेश्वर नारायण शिंदे (वय 19 वर्षे), रमेश मच्छिंद्र चव्हाण (वय 38), साजन प्रेमनाथचव्हाण (वय 25 वर्षे, सर्व रा. ओझर) हे जखमी झाले.

जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉ. हर्षलचांदा, डॉ. प्रशांत महाजन, डॉ. आर. के. पाटील यांनी उपचार केले. जितू पाटील, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, जालमसिंग राजपूत यांनी जखमींना दवाखान्यात आणण्यास मदत केली.

हेही वाचा - संचारबंदीचे उल्लंघन अन् सोशल डिस्टन्सिंगला देखील हरताळ.. जळगावात पाच व्यापाऱ्यांचे परवाने रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.