ETV Bharat / state

जिद्द व मेहनतीच्या जोरावर चमकला 'तेजस', दहावीत मिळवले 93 टक्के गुण! - tenth exam result jalgaon news

जळगावातील 'अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल'मध्ये शिकणाऱ्या तेजस विलास चौधरी या विद्यार्थ्याने दहावीच्या परिक्षेत अथक परिश्रम करत 93 टक्के गुण मिळवले आहेत. तेजसच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्याने शाळेव्यतिरिक्त कोणतीही खासगी शिकवणी न लावता त्याने हे यश मिळवले आहे.

तेजसने दहावीत मिळवले 93 टक्के गुण
तेजसने दहावीत मिळवले 93 टक्के गुण
author img

By

Published : Aug 4, 2020, 6:24 PM IST

जळगाव - तिसरीत असताना वडिलांचे छत्र हरपले. अशा परिस्थितीत शिवणकाम करून घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या आईच्या कष्टाची जाण ठेवत चांगला अभ्यास करून मुलाने दहावीच्या परीक्षेत 93 टक्के गुण मिळवले आहेत. ही प्रेरणादायी यशकथा आहे, जळगावातील तेजस विलास चौधरी या विद्यार्थ्याची. शहरातील अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचा तो विद्यार्थी असून, त्याने शाळेतून पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, शाळेव्यतिरिक्त कोणतीही खासगी शिकवणी न लावता त्याने हे यश मिळवले आहे.

तेजसचे वडील विलास चौधरी यांचे 2013 मध्ये आकस्मिक निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी आई अनिता चौधरी यांच्या खांद्यावर आली. पती नसल्याचे दुःख तर होतेच. पण मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायवर उभं करण्यासाठी वाट्टेल ते श्रम करायची तयारी अनिता यांनी ठेवली. हीच जिद्द मनाशी बाळगून शिवणकाम करत त्यांनी कुटुंबाची जबाबदारी चोखपणे सांभाळली. वडील वारले तेव्हा तेजस तिसरीत शिकत होता. तो लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्याने त्याला कोणत्याही गोष्टीची उणीव भासू नये म्हणून अनिता शक्य ते सर्व प्रयत्न करत होत्या.

घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तेजसला चांगल्या शाळेत शिकायला पाठवणे शक्य नव्हते. मात्र, याच काळात अनिता यांना 'अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल'बाबत माहिती मिळाली. आर्थिक दुर्बल घटकातील गुणवंत मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने जैन इरिगेशनचे संस्थापक भंवरलाल जैन यांनी ही शाळा सुरू केली होती. या शाळेच्या पहिल्याच बॅचमध्ये तेजसला प्रवेश मिळाला. दहावीत तेजसने चांगला अभ्यास करून 93 टक्के गुण मिळवत आपल्या आईच्या कष्टाचे चीज केले आहे.

आईला कामात मदत करून केला अभ्यास -

तेजसने आपल्या आईला तिच्या कामात मदत करून अभ्यास केला. दररोज तो किमान 2 ते 3 तास अभ्यास करत होता. नियमित वाचन, प्रश्नपत्रिका सोडवणे, पाठांतर करून त्याने परीक्षेत 93 टक्के गुण मिळवले आहेत. दहावीत असतानाही त्याने कोणतीही खासगी शिकवणी लावली नाही. शाळेत आणि घरीच चांगला अभ्यास करून त्याने हे यश संपादन केले आहे. त्याला शिक्षकांप्रमाणे आई अनिता यांनी देखील वेळोवेळी मार्गदर्शन केले, त्याचा उत्साह वाढवला. आईमुळेच मला यश मिळवता आले, आईने मला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे हे यश मी आईला समर्पित करतो, असे तेजसने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

क्लासवन अधिकारी व्हायचे स्वप्न -

दहावीनंतर पुढे बारावी करून अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याची तेजसची इच्छा आहे. अभियांत्रिकीनंतर स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन क्लासवन अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची आपली तयारी असल्याचेही त्याने सांगितले. घरची परिस्थिती हलाखीची असताना तेजसने आपल्या आईच्या कष्टाची जाण ठेवत उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्याचे यश सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. अशा भावना तेजसच्या शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.