ETV Bharat / state

जळगावात १७ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू - Suspicious death of girl in Jalgaon

जळगाव शहरातील मेश्वर कॉलनीतील तरुणाने सदर तरूणीचे अपहरण करत तिच्यावर अत्यावर केले आणि त्यानंतर तिचा खून केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

jalgaon police station
जळगाव पोलीस स्टेशन
author img

By

Published : Jul 20, 2020, 11:56 PM IST

जळगाव - शहरातील तांबापुरातील मच्छीबाजार परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली. या तरुणीचा मृतदेह मेहरुण तलावात आढळून आला आहे. तिचा एक हात ओढणीने बांधलेला होता. रामेश्वर कॉलनीतील तरुणाने तिचे अपहरण करत अत्यावर केले आणि त्यानंतर तिचा खून केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मच्छीबाजार परिसरात राहणारी ही तरुणी आदर्शनगरात धुणीभांडी करण्याचे काम करत होती. रविवारी नेहमीप्रमाणे ती सकाळी ११ वाजता कामासाठी गेली होती. यानंतर दुपारी १२.३० वाजता ती काम करत असलेल्या घरातून संशयित विशाल भोई नामक तरुणासोबत गेली होती. दुपारी २ वाजता तरुणीची आई तिला घेण्यासाठी गेली असता, हा प्रकार उघड झाला. सायंकाळपर्यंत तरुणी घरी न आल्यामुळे तिच्या वडिलांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यावरून रात्री अज्ञात तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतरही कुटुंबीयांनी तरुणीचा शोध सुरू ठेवला होता.

हेही वाचा - व्याधीग्रस्त मुलीवर मांत्रिकाचे अघोरी उपचार, चप्पल तोंडात धरून गावभर फिरवले

सोमवारी या तरुणीचा मृतदेह मेहरुण तलावात आढळून आला. यावेळी तिच्या एका हाताला ओढणी गुंडाळलेली होती. तर एक हात मोकळा होता. काही वेळातच तिची ओळख पटवण्यात आली. यानंतर एमआयडीसी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला.

शवविच्छेदन झाल्यावर मृत्यूचे कारण येणार समोर...

या तरुणीच्या अपहरणाचा गुन्हा रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल असल्याने तेथील पोलिसांनी मुलीच्या वडिलांचा जबाब घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दोन्ही पोलीस ठाण्यांचे पथक या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, तरुणीच्या मृतदेहाचे विच्छेदन झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाले आहेत किंवा नाही, तसेच तिच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.