ETV Bharat / state

हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश, अमित शाहांनी राजीनामा द्यावा - सुप्रिया सुळे - amit shah resignation

खासदार सुप्रिया सुळे आज जळगावच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. या दरम्यान शहरातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमापूर्वी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. दंगलीच्या काळात गृह मंत्रालय नेमके काय करत होते, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

sule
हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश, अमित शाहांनी राजीनामा द्यावा- सुप्रिया सुळे
author img

By

Published : Feb 28, 2020, 12:13 PM IST

Updated : Feb 28, 2020, 1:31 PM IST

जळगाव - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना राजधानी दिल्लीत हिंसाचार उसळणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. हा हिंसाचार गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश, अमित शाहांनी राजीनामा द्यावा- सुप्रिया सुळे

सुळे आज जळगावच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. या दरम्यान शहरातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमापूर्वी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. दंगलीच्या काळात गृह मंत्रालय नेमके काय करत होते, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

'मागील 5 वर्षे ज्यांनी पारदर्शक काम केल्याचा दावा केला, अशा केंद्र सरकारने याप्रकरणी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तर द्यायला हवे. त्यांनी याबाबत जाहीर माहिती दिली पाहिजे. अमित शाहांच्या जागी मी असते, तर निश्चितच आत्मचिंतन केले असते,' असेही त्या यावेळी म्हणाल्या.

हेही वाचा - दिल्लीतील जनजीवन पूर्व पदावर, परिस्थिती नियंत्रणात

'महिला सुरक्षेसाठी कायदे करणार'

राज्यात सत्तारूढ महाविकास आघाडी सरकार महिला सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. इतर बाबतीतही सरकार चांगले काम करत आहे. महिला सुरक्षेसाठी अजुन चांगले आणि कठोर कायदे सरकार करणार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

Last Updated : Feb 28, 2020, 1:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.