ETV Bharat / state

माजी आमदाराच्या निवासस्थानात विद्यार्थ्याची आत्महत्या - विद्यार्थी आत्महत्या न्यूज

अमळनेर येथील माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्या निवासस्थानात एका दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश हा मागील तीन वर्षांपासून डॉ. पाटील यांच्या निवासस्थानात राहत होता. त्याची आई पाटील यांच्याकडे कामाला होती तर वडील हातमजुरी करायचे.

Representative Image
प्रातिनिधिक छायाचित्र
author img

By

Published : Feb 27, 2020, 12:40 PM IST

जळगाव - अमळनेर येथील माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्या निवासस्थानात एका दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश नितीन भावसार (वय 16) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली.

न्यू प्लॉट भागातील डी. आर. कन्या शाळेसमोर माजी आमदार डॉ. पाटील यांचे दोन मजली घर आहे. पहिल्या मजल्यावर डॉ. पाटील आणि खालच्या मजल्यावर गणेशचे कुटुंब राहते. बुधवारी गणेशचे आई-वडिल गावाला गेले होते. घराच्या पोर्चजवळील बाथरुम खूपवेळ आतून बंद असल्याचे पाटील यांच्या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या संदीपच्या लक्षात आले. त्याने बाथरूमच्या खिडकीतून पाहिले असता गणेशने बाथरूममध्ये गळफास घेतल्याचे दिसले.

हेही वाचा - मालेगावात माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार, तब्बल ७ गोळ्या झाडल्या

त्यानंतर पाटील आणि त्यांच्या पत्नी सुनीता यांनी शेजारी व संदीपच्या मदतीने गणेशला बाहेर काढले. उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

गणेशच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात आहे. गणेश हा मागील तीन वर्षांपासून डॉ. पाटील यांच्या निवासस्थानात राहत होता. त्याची आई पाटील यांच्याकडे कामाला होती तर वडील हातमजुरी करायचे. गणेश दहावीचा विद्यार्थी होता. काही दिवसांवर परीक्षा येऊन ठेपली होती, त्याआधीच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.