ETV Bharat / state

अहो आश्चर्यम.. मुलीच्या डोळ्यातून निघतात हरभऱ्याच्या आकाराचे खडे! - jalgaon news

गेल्या दोन दिवसात तिच्या डोळ्यातून 20 ते 22 खडे निघाले आहेत, असा दावा तिच्या आई-वडिलांनी केला आहे. मात्र, असा प्रकार शक्य नाही, ही केवळ अंधश्रद्धा आहे, असे नेत्रतज्ञांनी सांगितल्याने या घटनेचे गूढ वाढले आहे.

जळगाव
author img

By

Published : Jul 6, 2019, 10:56 AM IST

जळगाव - एका 10 वर्षीय मुलीच्या डोळ्यातून हरभऱ्याच्या आकाराचे खडे निघत असल्याचा आश्चर्यकारक प्रकार चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावात घडला आहे. दरम्यान, हा दैवी चमत्कार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, असा प्रकार शक्य नाही. ही केवळ अंधश्रद्धा आहे, असे नेत्रतज्ज्ञांनी सांगितल्याने या घटनेचे गूढ कायम आहे.

जळगाव

श्रद्धा राधेश्याम पाटील असे त्या मुलीचे नाव असून गेल्या दोन दिवसात तिच्या डोळ्यातून 20 ते 22 खडे निघाले आहेत, असा दावा तिच्या आई-वडिलांनी केला. दोन दिवसांपूर्वी श्रद्धा ही घराशेजारी खेळत होती. तेव्हा तिच्या डोळ्यातून खडे निघाले. ही बाब तिच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनी तिच्या आई-वडिलांना सांगितली. पण, त्यावर त्यांचा विश्वास बसला नाही. मात्र, श्रद्धाला त्रास होऊ लागल्याने राधेश्याम पाटील यांनी तिला डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या दवाखान्यात नेले. डॉ. पाटील यांनी तिच्या डोळ्यांची तपासणी केली. काही वेळाने तिचा डोळा दाबला असता, एक खडा डोळ्यातून तळ हातावर पडला, असे डॉ. चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यानंतर पाटील यांनी श्रद्धाला नेत्रतज्ज्ञाकडे नेण्याचा सल्ला दिला. मग तिला चाळीसगाव येथील नेत्र रोगतज्ज्ञ डॉ. अमित महाजन यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनी श्रद्धाच्या डोळ्यांची तपासणी केली. तिच्या डोळ्यांना संसर्ग झाला आहे, असे सांगून औषध दिले. त्यांनी डोळ्यातून अशा प्रकारे खडे निघू शकत नाहीत, असे सांगितले.

दैवी चमत्काराची चर्चा -

या घटनेची जिल्हाभरात एकच चर्चा सुरू आहे. 'मला नवनाथ बाबांचा फोटो दिसतो', असे श्रद्धा सांगत असल्याने हा दैवी चमत्कार असल्याचे बोलले जात आहे. समाजमाध्यमांवर देखील या घटनेच्या चित्रफिती व्हायरल झाल्या आहेत.

Intro:जळगाव
एका 10 वर्षीय मुलीच्या डोळ्यातून हरभऱ्याच्या आकाराचे खडे निघत असल्याचा आश्चर्यकारक प्रकार जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या पिलखोड गावात घडला आहे. दरम्यान, हा दैवी चमत्कार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, असा प्रकार शक्य नाही. ही केवळ अंधश्रद्धा आहे, असे नेत्रतज्ञांनी सांगितल्याने या घटनेचे गूढ कायम आहे.Body:श्रद्धा राधेश्याम पाटील असे मुलीचे नाव असून गेल्या दोन दिवसात तिच्या डोळ्यातून 20 ते 22 खडे निघाले आहेत, असा दावा तिच्या आई वडिलांनी केला. दोन दिवसांपूर्वी श्रद्धा ही घराशेजारी खेळत होती. तेव्हा तिच्या डोळ्यातून खडे निघाले. ही बाब तिच्या सोबत खेळणाऱ्या मुलांनी तिच्या आई वडिलांना सांगितली. पण त्यावर त्यांच्या विश्वास बसला नाही. मात्र, श्रद्धाला त्रास होऊ लागल्याने राधेश्याम पाटील यांनी तिला डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या दवाखान्यात नेले. डॉ. पाटील यांनी तिच्या डोळ्यांची तपासणी केली. काही वेळाने तिचा डोळा दाबला असता एक खडा डोळ्यातून तळ हातावर पडला, असे डॉ. चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यानंतर पाटील यांनी श्रद्धाला नेत्रतज्ञाकडे नेण्याचा सल्ला दिला. मग तिला चाळीसगाव येथील नेत्र रोगतज्ञ डॉ. अमित महाजन यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनी श्रद्धाच्या डोळ्यांची तपासणी केली. तिच्या डोळ्यांना संसर्ग झाला आहे, असे सांगून औषध दिले. त्यांनी डोळ्यातून अशा प्रकारे खडे निघू शकत नाही, असे सांगितले.Conclusion:दैवी चमत्काराची चर्चा-

या घटनेची जिल्हाभरात एकच चर्चा सुरू आहे. 'मला नवनाथ बाबांचा फोटो दिसतो', असे श्रद्धा सांगत असल्याने हा दैवी चमत्कार असल्याचे बोलले जात आहे. समाजमाध्यमांवर देखील या घटनेच्या चित्रफिती व्हायरल झाल्या आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.