चोपडा (जळगाव) - कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत खबरदारी म्हणून सभा तसेच बैठका घेण्यास शासनाने परवानगी नाकारली आहे. शासनाच्या उपसचिवांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सभा, बैठका या केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घ्याव्यात, असे सुचविण्यात आले आहे. त्या अनुशंगाने जळगाव जिल्ह्यातील चोपडा नगरपरिषदेच्या स्थायी समितीची सभा नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली.
चोपडा नगरपरिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही सभा पार पडली. विशेष बाब म्हणजे, संपूर्ण महाराष्ट्रात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभा घेणारी नगरपरिषद म्हणून चोपडा नगरपरिषद ही पहिली नगरपरिषद ठरली. पिठासीन अधिकारी तथा अध्यक्ष म्हणून चोपडा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा मनिषा चौधरी होत्या. या सभेला 9 सदस्यांनी उपस्थिती लावली. सभा घेण्याआधी सकाळी 11 वाजता सर्व सदस्यांना प्रात्यक्षिक देण्यात आले. प्रात्यक्षिकामध्ये सर्व सदस्यांना ऑनलाईन सभेविषयीच्या सर्व शंका व अडचणींचे निरसन करण्यात आले. त्यानंतर दुपारी 4 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले.
सभेच्या विषय पत्रिकेवर एकूण 29 विषय होते. प्रत्येक विषयावर चर्चेअंती समर्थन आणि विरोध याची नोंद ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आली. त्याची नोंद पीडीएफ स्वरुपात जतन करण्यात आली. या सभेत शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांवर धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.
सभेस उपनगराध्यक्ष भूपेंद्र गुजराथी, गटनेते जीवन चौधरी, सदस्य हितेंद्र देशमुख, सुरेखा माळी, सीमा श्रावगी, रमेश शिंदे, अशोक बाविस्कर, किशोर चौधरी तसेच मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, उपमुख्याधिकारी पूनम राणे, सभा अधिक्षक निलेश ठाकूर, कार्यालय अधीक्षक रविंद्र जाधव, बांधकाम अभियंता सचिन गवांदे, स्वच्छता निरीक्षक व्ही. के. पाटील, संगणक अभियंता रोहीत सुरसे, पाणी पुरवठा अभियंता पल्लवी घिंवदे, भांडारपाल भिकन पारधी आदी उपस्थित होते.चोपडा नगरपरिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही सभा पार पडली.
विशेष बाब म्हणजे, संपूर्ण महाराष्ट्रात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभा घेणारी नगरपरिषद म्हणून चोपडा नगरपरिषद ही पहिली नगरपरिषद ठरली. पिठासीन अधिकारी तथा अध्यक्ष म्हणून चोपडा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा मनिषा चौधरी होत्या. या सभेला 9 सदस्यांनी उपस्थिती लावली. सभा घेण्याआधी सकाळी 11 वाजता सर्व सदस्यांना प्रात्यक्षिक देण्यात आले. प्रात्यक्षिकामध्ये सर्व सदस्यांना ऑनलाईन सभेविषयीच्या सर्व शंका व अडचणींचे निरसन करण्यात आले. त्यानंतर दुपारी 4 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले. सभेच्या विषय पत्रिकेवर एकूण 29 विषय होते. प्रत्येक विषयावर चर्चेअंती समर्थन आणि विरोध याची नोंद ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आली. त्याची नोंद पीडीएफ स्वरुपात जतन करण्यात आली. या सभेत शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांवर धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.
सभेस उपनगराध्यक्ष भूपेंद्र गुजराथी, गटनेते जीवन चौधरी, सदस्य हितेंद्र देशमुख, सुरेखा माळी, सीमा श्रावगी, रमेश शिंदे, अशोक बाविस्कर, किशोर चौधरी तसेच मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, उपमुख्याधिकारी पूनम राणे, सभा अधिक्षक निलेश ठाकूर, कार्यालय अधिक्षक रविंद्र जाधव, बांधकाम अभियंता सचिन गवांदे, स्वच्छता निरीक्षक व्ही. के. पाटील, संगणक अभियंता रोहीत सुरसे, पाणी पुरवठा अभियंता पल्लवी घिंवदे, भांडारपाल भिकन पारधी आदी उपस्थित होते.