ETV Bharat / state

ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी उपसले संपाचे हत्यार; लालपरीची चाके थांबल्याने प्रवासी वेठीस

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या काळात राज्यभर संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे दिवाळीसाठी परगावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनीही आज (7 नोव्हेंबर) दुपारी 12 वाजल्यापासून संप पुकारल्याने बस सेवा ठप्प झाली आहे. राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करेपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

f
f
author img

By

Published : Nov 7, 2021, 9:02 PM IST

Updated : Nov 7, 2021, 9:46 PM IST

जळगाव - एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या काळात राज्यभर संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे दिवाळीसाठी परगावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनीही आज (7 नोव्हेंबर) दुपारी 12 वाजल्यापासून संप पुकारल्याने बस सेवा ठप्प झाली आहे. राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करेपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी उपसले संपाचे हत्यार; लालपरीची चाके थांबल्याने प्रवासी वेठीस

शेकडो बसेस थांबल्या जागेवर

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यावी, यासह इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जळगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी रविवारी दुपारी 12 वाजेपासून संप पुकारला. त्यामुळे शेकडो एसटी बसेस आगारातच उभ्या आहेत. त्यामुळे प्रवासीवर्गाचे हाल होत आहेत. जळगावातून जिल्ह्यासह परजिल्ह्यात जाणाऱ्या तसेच परजिल्ह्यातून जळगावात येणारी बससेवा ठप्प झाली आहे. अशा परिस्थितीत प्रवासी आगारातच अडकून पडले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काहींनी वाढीव भाडे देत नाईलाजाने खासगी वाहनांचा आधार घेतला. तर काही प्रवाशांना मात्र आगारातच थांबून राहण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता.

अन्यथा कुटुंबीयांसोबत रस्त्यावर उतरू; एसटी कर्मचाऱ्यांचा शासनाला इशारा

संपावर उतरलेले एसटी कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी चांगलेच आक्रमक झाले आहेत. 'आज फक्त एसटी बसेस बंद आहेत. राज्य शासनाने आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर उद्यापासून आम्ही परिवारासह रस्त्यावर उतरून आंदोलन करू', असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाला दिला आहे.

राज्यभर सुरू आहे आंदोलन

राज्‍य परिवहन महामंडळाचे कर्मचारी राज्‍यभरात आंदोलन करत आहेत. वेतनवाढीसह अन्‍य मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे. दिवाळीपूर्वी दोन दिवस राज्‍यभरातील सर्व आगारांमध्‍ये कर्मचारी संपावर असल्‍याने बससेवा बंद झाली होती. यानंतर राज्‍य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन बेकायदेशीर असल्‍याचे ठरवत कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे सांगितले होते. यानंतर काही ठिकाणी बससेवा सुरू झाली. पण, अजूनही काही ठिकाणी आंदोलन केले जात आहे.

एसटी महामंडळाला आर्थिक फटका

दिवाळी उत्‍सव हा एसटी महामंडळासाठी महत्त्वाचा हंगाम मानला जातो. या दिवसात एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणावर उत्‍पन्‍न मिळते. पण, या गर्दीच्‍या हंगामातच कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने बससेवा ठप्प झाली असून, एसटीचे मोठे आर्थिक उत्‍पन्‍न बुडत आहे. दिवाळीमुळे एसटीला प्रवाशांची मोठी गर्दी आहे. काहीजण दिवाळीला गावी आले असताना, आज रविवारनंतर सुटी संपणार असल्‍याने परतीच्‍या प्रवासाला लागले आहेत. यामुळे बसला गर्दी आहे. पण एसटी बसेस संपामुळे बंद असल्याने सर्वांचीच गैरसोय होत आहे.

हे ही वाचा - जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे भाजप नेत्यांना भोवले; माजीमंत्री गिरीश महाजनांसह इतरांवर गुन्हा दाखल

Last Updated : Nov 7, 2021, 9:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.