ETV Bharat / state

पगाराच्या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे जळगावात आंदोलन

कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व जिल्ह्यातील एसटी सेवा मागील ५ महिन्यांपासून ठप्प आहे. यातच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा मागील दोन महिन्यांचा पगार थकित आहे. तो पगार लवकारत लवकर मिळावा म्हणून कर्मचाऱ्यांनी नवीन बस स्थानकात आंदोलन केले.

st employee agitation for pending two month payment in jalgaon
पगाराच्या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे जळगावात आंदोलन
author img

By

Published : Sep 16, 2020, 6:57 PM IST

जळगाव - जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे थकीत वेतन मिळावे, याकरिता एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नवीन बसस्थानकाच्या आवारात बुधवारी घोषणा देत आंदोलन केले. वेतन न मिळाल्यास त्यांनी उपोषणाला बसू, असा इशारा दिला आहे. थकीत वेतनाच्या मागणीचे निवेदन आंदोलनानंतर विभाग नियंत्रकांना देण्यात आले.

पगाराच्या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे जळगावात आंदोलन

विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे, की जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे पगार न मिळाल्यामुळे कुटुंबांचे हाल होत आहे. उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर वेतन करण्यात यावे. यापूर्वी देखील दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्याने बुधवारी आंदोलन करावे लागत आहे. कर्मचाऱ्यांनी टाळेबंदी काळात 33 टक्केनुसार सोपविलेले कर्तव्य पार पाडले आहे. कर्मचाऱ्यांना पोटासाठी मोलमजुरी देखील करावी लागत आहे. अनेक जण उदरनिर्वाहासाठी भाजीपाला विकत आहेत, काही जण शेतात मजुरी करत आहेत. कर्मचाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन थकीत पगारासंदर्भात मागणी करुनही लक्ष दिले जात नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार कमी आहेत. पण ते देखील रखडल्याने कर्मचारी संकटात सापडले आहेत.

मध्यंतरी राज्य सरकारने एसटीला मदत म्हणून पॅकेज जाहीर केले. त्याचा वापर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी करावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. आता पगार झाले नाहीत तर कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तीन महिन्यांपासून पगार नसल्याने कर्मचारी कसेबसे दिवस काढत आहेत. घरखर्च भागवताना खूप अडचणी निर्माण होत आहेत. तरी सरकारने या बाबतीत लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी केली.

एसटी कर्मचारी व कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल. त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या आंदोलनावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.