ETV Bharat / state

शेकोटीमुळे झोपडीला आग... वृद्धाचा झोपेतच होरपळून मृत्यू

देवराम पाटील हे गेल्या 15 वर्षांपासून शेतातील झोपडीत राहत होते. रविवारी रात्रीही ते शेतातील झोपडीतच झोपलेले होते. सध्या वातावरणातील बदलामुळे रात्रीच्या वेळी गारठा वाढलेला आहे. म्हणून त्यांनी झोपण्यापूर्वी झोपडीजवळ शेकोटी केली. त्यानंतर ते झापले. मात्र, शेकोटीमुळे रात्री अचानक झोपडीला आग लागली.

sleepy-old-man-dies-in-sleep-due-to-fire-in-jalgaon
शेकोटीमुळे झोपडीला आग...
author img

By

Published : Mar 16, 2020, 4:10 PM IST

जळगाव- जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या वाघडू गावात शेतातील झोपडीला आग लागून एका वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला. देवराम नंदराम पाटील (वय 70) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

शेकोटीमुळे झोपडीला आग...

हेही वाचा- जाणून घ्या जगभरातील महत्त्वाच्या दहा घडामोडी...

देवराम पाटील हे गेल्या 15 वर्षांपासून शेतातील झोपडीत राहत होते. रविवारी रात्रीही ते शेतातील झोपडीतच झोपलेले होते. सध्या वातावरणातील बदलामुळे रात्रीच्या वेळी गारठा वाढलेला आहे. म्हणून त्यांनी झोपण्यापूर्वी झोपडीजवळ शेकोटी केली. त्यानंतर ते झापले. मात्र, शेकोटीमुळे रात्री अचानक झोपडीला आग लागली. देवराम पाटील झोपेत असल्याने त्यांचा झोपडीतच होरपळून मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

ही घटना समोर आल्यानंतर वाघडू ग्रामस्थांनी चाळीसगाव तालुका पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.