ETV Bharat / state

जळगावात हाथरस घटनेविरुद्ध शिवसेनेची निदर्शने; पीडितेला न्याय देण्याची मागणी - जळगाव शिवसेना न्यूज

हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त केला जात आहे. या मुद्द्यावरून जळगावात शिवसेना आक्रमक झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसेनेने निदर्शने केली.

Shivsena demonstration
शिवसेना निदर्शने
author img

By

Published : Oct 5, 2020, 2:26 PM IST

जळगाव - उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक अत्याचार प्रकरणामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जळगावात शिवसेनेच्यावतीने हाथरस येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी निदर्शने करण्यात आली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

या घटनेतील आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशा मागण्या यावेळी शिवसेनेच्यावतीने करण्यात आल्या. हाथरसला घडलेल्या घटनेची केंद्र सरकारने गंभीरपणे दखल घेण्याची गरज होती. मात्र, केंद्र सरकारची भूमिका संशयास्पद आहे. हाथरसमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना येऊ दिले जात नाही. पीडितेच्या कुटुंबीयांना डांबून ठेवले आहे. प्रसारमाध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचू दिले जात नाही. ही लोकशाहीची हत्या आहे, अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे या घटनेबाबत बोलण्यास तयार नाहीत. हेच रामराज्य आहे का? हिंदुत्व मिरवणाऱ्या भाजपाचा खोटा चेहरा समोर आला आहे. पीडितेचा अंत्यविधी रात्रीच करण्यात आला. उत्तर प्रदेश सरकार या घटनेत काय दडवण्याचा प्रयत्न करत आहे? असे प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, युवाशक्तीचे विराज कावडिया, अमित जगताप, महिला महानगरप्रमुख ज्योती शिवदे, मनीषा पाटील, उषा जाधव, कविता पाटील, पद्मजा चोरडिया, भारती सोनवणे, वंदना कापसे, वर्षा सपकाळे आदींनी सहभाग नोंदवला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.