ETV Bharat / state

गटबाजीचा प्रयत्न केला तर याद राखा; शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनी टोचले नाराज पदाधिकाऱ्यांचे कान! - sanjay sawant news

जळगाव जिल्हा शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून गटबाजी उफाळून आली आहे. वेगवेगळ्या आंदोलनांमधून त्याचा प्रत्यय येत आहे.

jalgaon shivsena
शिवसेनेचे नाराज कार्यकर्त
author img

By

Published : Oct 5, 2020, 6:28 PM IST

जळगाव - शिवसेनेत कोणतेही गट-तट खपवून घेतले जाणार नाहीत. माझ्यापर्यंत अनेक कुरबुरी आल्या आहेत. जे झालं ते जाऊ द्या. भविष्यात जी काही आंदोलने होतील; त्या आंदोलनासाठी महानगरप्रमुख व जिल्हाप्रमुख यांची परवानगी तसेच उपस्थिती आवश्यक असेल. त्यांच्या परवानगीविना झालेले कोणत्याही प्रकारचे आंदोलन व कार्यक्रम हे शिवसेनेचे अधिकृत आंदोलन किंवा कार्यक्रम नसतील. गटबाजीचा प्रयत्न केला तर याद राखा, अशा शब्दांत शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी शिवसेनेचे नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कान टोचले.

संजय सावंत - शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख

जळगाव जिल्हा शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून गटबाजी उफाळून आली आहे. वेगवेगळ्या आंदोलनांमधून त्याचा प्रत्यय येत आहे. एकीकडे पक्षसंघटनेत गटबाजी वाढत असताना, दुसरीकडे भाजपचे माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा असल्याने शिवसेनेचे काही नगरसेवक त्यांच्यासोबत जाऊ शकतात, अशी भीती आहे. याच हालचाली लक्षात घेऊन शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात सावंत यांच्याकडून पक्षाचे 'डॅमेज कंट्रोल' रोखण्यासाठी चाचपणी सुरू आहे. याच अनुषंगाने सोमवारी दुपारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि संजय सावंत यांनी शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह, नगरसेवक व कार्यकर्त्यांची बंदद्वार बैठक घेतली. या बैठकीत गुलाबराव पाटील व संजय सावंत यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. बैठकीत दोन्ही नेत्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. काही अडचणी असतील तर थेट नेत्यांशी बोला. पक्षाचे काम जनतेपर्यंत पोहचवा. जनतेच्या अडीअडचणी समजून घ्या. एकमेकांच्या संपर्कात रहा. तक्रारी सोडून पक्षसंघटन मजबुतीसाठी प्रयत्नशील रहा, अशा सूचना यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. दरम्यान, बैठकीत काही कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे आपल्या अडचणी नेत्यांसमोर मांडल्या. त्यावर योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले.

शिवसेना नगरसेवकांची नाराजी पालकमंत्र्यांनी केली दूर

महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी हे शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागातील कामे करत नसल्याची तक्रार काही नगरसेवकांनी पालकमंत्र्यांकडे केली. याबाबत आयुक्तांच्या बदलीचे संकेत पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले. आयुक्त सतीश कुलकर्णी केवळ सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागातील कामे करत आहेत. आयुक्तांना याबाबत समज द्यावी किंवा त्यांची बदली करण्याची मागणी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी आयुक्त कुलकर्णी यांना फोन देखील केला. मात्र, काही कारणास्तव आयुक्तांशी चर्चा होऊ शकली नाही. याबाबत आयुक्तांशी चर्चा केली जाईल, तरीही त्यांनी लक्ष दिले नाही तर त्यांच्या बदलीबाबत विचार करावा लागेल, असेही संकेत या बैठकीत पालकमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जे आहे ते मोकळेपणाने बोला-

शिवसेनेचे काही नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र, या केवळ चर्चा असून, शिवसेना एकसंघ आहे. कोणताही नगरसेवक कुठेही जाणार नसून, कोणीही नाराज नसल्याची माहिती संजय सावंत यांनी बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. बैठकीत या मुद्द्यावर देखील चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोणतीही तक्रार असेल तर मनमोकळ्यापणाने आपल्याकडे मांडावी, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व नगरसेवकांना बैठकीत सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.