ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात सर्वसामान्यांसाठी पेट्रोल-डिझेल विक्री बंद; अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना सूट

जळगाव जिल्ह्यात आता केवळ अत्यावश्यक सेवा आणि सेवा देणाऱ्यांसाठीच पेट्रोल-डिझेल उपलब्ध असणार आहे. मात्र, त्यासाठी देखील वेळेची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात सर्वसामान्यांसाठी पेट्रोल-डिझेल विक्री बंद

author img

By

Published : Mar 25, 2020, 10:37 AM IST

जळगाव - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकामी नागरिक सहकार्य करत नसल्याने राज्य सरकारकडून आता कठोर निर्णय घेतले जात आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सर्वसामान्यांसाठी आज(बुधवार) दुपारी 3 वाजेपासून पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्यात आली आहे. यापुढे 31 मार्चपर्यंत केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच पेट्रोल-डिझेल मिळणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे.

जळगाव जिल्ह्यात आता केवळ अत्यावश्यक सेवा आणि सेवा देणाऱ्यांसाठीच पेट्रोल-डिझेल उपलब्ध असणार आहे. मात्र, त्यासाठी देखील वेळेची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. महापालिका व जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील व शहराच्या 3 किलोमीटर परिसरातील सर्व पेट्रोल-डिझेल पंप 31 मार्चपर्यंत सकाळी 7 ते 10 आणि दुपारी 4 वाजेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवा आणि सेवा देणाऱ्यांसाठीच पेट्रोल-डिझेल मिळणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

यांनाच मिळणार पेट्रोल-डिझेल -

सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, कर्तव्यावर असलेली वाहने, जीवनावश्यक वस्तू आणि सेवा पुरविणारी वाहने, सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, खासगी डॉक्टर आणि नर्सेस, वैद्यकीय सेवेशी संबंधित घटक, प्रसार माध्यमांची वाहने व प्रतिनिधींची वाहने, वृत्तपत्र विक्रेते व वितरणाशी संबंधित यंत्रणा, गणवेशधारी पोलीस अधिकारी, कर्मचारी, घंटागाड्या, पाणीपुरवठा करणारी वाहने, एनजीओ, अन्न-भाजीपाला, फळे, दूध पुरवठा करणारी वाहने यांनाच पेट्रोल-डिझेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पेट्रोलपंप चालकांना विक्रीची नोंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.