ETV Bharat / state

रिक्षात बसवून प्रवाशाला तिघांनी लुटले; रिक्षाचालकास अटक - जळगाव क्राइम न्यूज

प्रवाशाला रिक्षात बसवून तिघांनी लुटल्याची घटना जळगावात समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आली आहे.

Jalgoan
जळगाव
author img

By

Published : Nov 2, 2020, 6:26 PM IST

जळगाव - एका प्रवाशाला रिक्षात बसवून तिघांनी लुटल्याची घटना ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी महामार्गावर घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच रामानंदनगर पोलिसांनी रिक्षाचालकास अटक केली आहे. अभिजीत राजू मराठे (रा.पिंपळकोठा,ता. एरंडोल) असे लुट झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. तर रिक्षाचालक वसीम शेरअली तेली (२८, रा.फातेमानगर) यास रविवारी रात्री पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून लुटीतील ८०० रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहे.

अभिजीत मराठे हे ३० तारखेला सायंकाळी इच्छादेवी चौकातून पिंपळकोठा जाण्यासाठी रिक्षात (एमएच १९ व्ही ५८४१) बसले. मागे बसलेल्या तिघांनी काही अंतरावर मराठे यांच्या खिशातून २४०० रुपये व मोबाईल जबरदस्तीने काढून घेत त्यांना रस्त्यावर उतरवून पळ काढला होता. या घटनेनंतर मराठे यांनी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठुन फिर्याद दिली. त्यानुसार जबरीलुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाळ चौधरी, विजय खैरे, शिवाजी धुमाळ, रवींद्र पाटील, रवींद्र चौधरी, उमेश पवार, हरीष डोईफोळे, संतोष गीते व सागर देवरे यांच्या प‌थकाने रिक्षाचालकाचा शोध सुरू केला. रविवारी रात्री हा रिक्षाचालक पोलिसांच्या हाती लागला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील रिक्षा देखील जप्त केली आहे. या गुन्ह्यातील इतर दोन संशयित अद्याप बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.