ETV Bharat / state

रावेर मतदारसंघ : भाजपच्या प्रचारात शिवसैनिकांचा निरुत्साह, विजयासाठी काँग्रेसची कसरत

या मतदारसंघात भाजपचे पाच आमदार, एक खासदार आहे. शिवाय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका, ग्रामपंचायतदेखील भाजपच्या ताब्यात आहेत.

डॉ. उल्हास पाटील, रक्षा खडसे
author img

By

Published : Apr 20, 2019, 5:40 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रमुख लढत आहे. याठिकाणी भाजपचे हेवीवेट नेते एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे तर काँग्रेसकडून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे रिंगणात आहेत. भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने व्यूहरचना आखली आहे. त्यात शिवसेनेचाही सक्रीय सहभाग अल्प असल्याचे चित्र सध्या मतदारसंघात पाहायला मिळत आहे.

रावेर मतदारसंघ

रावेर लोकसभा मतदारसंघ हा पूर्वाश्रमीचा काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र, भाजपने काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावत आपली पाळंमुळं खोलवर रुजवली. १९९८ साली डॉ. उल्हास पाटील यांचा अपवाद वगळता गेल्या अनेक वर्षांपासून रावेरात सातत्याने भाजपचा खासदार निवडून येत आहे. गुणवंतराव सरोदे, वाय.जी. महाजन, हरिभाऊ जावळे यांच्यानंतर रक्षा खडसे यांनी रावेर मतदारसंघाचे सातत्याने प्रतिनिधित्व केल आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे विधानसभा मतदारसंघही याच लोकसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे या ठिकाणी भाजपची ताकद काँग्रेसपेक्षा अधिक असल्याचे दिसत आहे. या मतदारसंघात भाजपचे पाच आमदार, एक खासदार आहे. शिवाय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका, ग्रामपंचायतदेखील भाजपच्या ताब्यात आहेत. उत्तम पक्ष संघटन, बूथ टू बूथ मार्किंग यादेखील भाजपच्या जमेच्या बाजू आहेत. मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेसोबत दिलजमाईचा झाल्याचा दावा मध्यंतरी रक्षा खडसेंनी केला होता. परंतु, प्रचारात अजूनही शिवसैनिक न दिसणं ही एकमेव बाब काँग्रेसच्या पथ्थ्यावर पडणारी आहे.

भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि इतर मित्र पक्षांनी आघाडीच्या माध्यमातून एकत्र येत भाजपचा उधळलेला वारू रोखण्यासाठी रणनीती आखली आहे. रावेरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच सुरु होती. शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला सोडली. आपली लढाई थेट मोदींशी असून धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

Intro:Feed send to FTP
जळगाव
जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रमुख लढत आहे. याठिकाणी भाजपचे हेवीवेट नेते एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे तर काँग्रेसकडून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील रिंगणात आहेत. भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीची व्यूहरचना आखली असली तरी देखील भाजपचं पारडं जड आहे. प्रचारात भाजप आघाडीवर आहे, तर काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचं दिसून येतंय.Body:रावेर लोकसभा मतदारसंघ हा पूर्वाश्रमीचा काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र, भाजपनं काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात सुरुंग लावत आपली पाळंमुळं खोलवर रुजवली. १९९८ साली डॉ. उल्हास पाटील यांचा अपवाद वगळता गेल्या अनेक वर्षांपासून रावेरात सातत्यानं भाजपचा खासदार निवडून येतोय. गुणवंतराव सरोदे, वाय.जी. महाजन, हरिभाऊ जावळे यांच्यानंतर रक्षा खडसे यांनी रावेर मतदारसंघाचे सातत्याने प्रतिनिधित्व केलंय. आता भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि इतर मित्र पक्षांनी आघाडीच्या माध्यमातून एकत्र येत भाजपचा उधळलेला वारू रोखण्यासाठी रणनीती आखली खरी... मात्र, एकमेकातील बे-दिली, समन्वयाचा अभाव यामुळं आघाडीला हे आव्हान पेलणं शक्य नसल्याचं चित्र आहे. माजीमंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे विधानसभा मतदारसंघही याच लोकसभा मतदारसंघात येत असल्यानं आपसूकच भाजपची ताकद काँग्रेसपेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहे. या मतदारसंघात भाजपचे 5 आमदार, 1 खासदार आहेत. शिवाय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका, ग्रामपंचायती देखील भाजपच्या ताब्यात आहेत. उत्तम पक्ष संघटन, बूथ टू बूथ मार्किंग यादेखील भाजपच्या जमेच्या बाजू आहेत. मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेसोबत दिलजमाईचं झाल्याचा दावा मध्यंतरी रक्षा खडसेंनी केला होता. परंतु, प्रचारात अजूनही शिवसैनिक न दिसणं ही एकमेव बाब काँग्रेसच्या पथ्थ्यावर पडणारी आहे. गेल्या पाच वर्षात भाजपने पूर्ण केलेली आश्वासने, विकासकामांच्या जोरावर मतदार पुन्हा संधी देतील, असा विश्वास रक्षा खडसेंना आहे.

रावेरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच सुरु होती. शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीनं ही जागा काँग्रेसच्या वाट्याला सोडली. भाजपला शह देणं सोपं नसल्यानं अपयशाचे वाटेकरी होण्यापेक्षा जागा काँग्रेसला दिलेली बरी, या मानसिकतेतून राष्ट्रवादीने जागा सोडल्याचं बोललं जातंय. आता प्रचारातही राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी काँग्रेसच्या सोबत दिसत नसल्यानं त्यावर शिक्कामोर्तब झालंय. दुसरीकडे काँग्रेसचे नेतेही रावेरबाबत सकारात्मक नसल्याचं दिसतंय. प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रचारासाठी रावेरात येणं टाळलंय. काँग्रेस भाजपला सरेंडर झाली की काय, असा प्रश्न मतदारांमधून उपस्थित केला जातोय. आपली लढाई थेट मोदींशी असून धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचं सांगणाऱ्या डॉ. पाटलांची वाट बिकट असल्याचं दिसून येतंय.Conclusion:गेल्या निवडणुकीत भाजपनं अच्छे दिनचा नारा दिला होता. आता निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देणारी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना, पुलवामा हल्ल्यानंतर झालेला सर्जिकल स्ट्राईक तसंच मोदी है; तो मुमकिन है या नाऱ्यावर भाजप निवडणूक लढवत असल्यानं रावेरमध्ये जनमताचा कौल रक्षा खडसेंच्या बाजूने आहे. त्यातच काँग्रेस सर्वच आघाड्यांवर दुबळी असल्यानं लढत पूर्णपणे एकतर्फी होण्याची शक्यता आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.