ETV Bharat / state

मिळेल त्याला गळाला लावण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न यशस्वी होणार नाही- गिरीश महाजन

बुधवारी रात्री अजित पवार आणि भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे यांची गुप्त भेट झाल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चेनंतर आज (गुरुवारी) दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार खडसेंच्या भेटीला येत असल्याची देखील चर्चा आहे. दरम्यान, एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, असेही यावेळी गिरीश महाजन म्हणाले. या संपूर्ण राजकीय घडामोडींमुळे जळगाव जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

author img

By

Published : Oct 3, 2019, 3:12 PM IST

गिरीश महाजन

जळगाव : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत खाते उघडणे अवघड आहे. त्यामुळे मिळेल त्याला गळाला लावण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. तो कधीच यशस्वी होणार नाही, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या आणि अजित पवारांच्या चर्चित भेटीवर दिली आहे.

मिळेल त्याला गळाला लावण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न यशस्वी होणार नाही- गिरीश महाजन

हेही वाचा - दुसऱ्या यादीतही एकनाथ खडसेंना ठेंगा; पत्ता कापल्याचे निश्चित?

बुधवारी रात्री अजित पवार आणि भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे यांची गुप्त भेट झाल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चेनंतर आज (गुरुवारी) दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार खडसेंच्या भेटीला येत असल्याची देखील चर्चा आहे. दरम्यान, एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, असेही यावेळी गिरीश महाजन म्हणाले. या संपूर्ण राजकीय घडामोडींमुळे जळगाव जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

हेही वाचा - विधानसभा निवडणूक 2019 : 'हे' दिग्गज भरणार आज उमेदवारी अर्ज

दरम्यान, खडसेंना डावलल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. बहुजन समाजातील नेतेही आक्रमक झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर, भुसावळ आणि जळगाव शहर या मतदारसंघातील भाजपने उमेदवारी जाहीर केलेले उमेदवार देखील पक्षाची उमेदवारी नाकारणार असल्याची चर्चा आहे. हे तिघे उमेदवार कट्टर खडसे समर्थक आहेत. त्यात रावेरचे हरिभाऊ जावळे, भुसावळचे संजय सावकारे आणि जळगाव शहरचे सुरेश भोळे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे खडसेंच्या सून रक्षा खडसे देखील खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

अजित पवार ए. बी. फॉर्म आणणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे खडसेंच्या भेटीसाठी मुक्ताईनगरला येणार असल्याचे सांगितले जात आहे. ते आपल्यासोबत ए. बी. फॉर्म आणणार असल्याचेही बोलले जात आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर खडसे काय निर्णय घेतात, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. खडसेंच्या प्रश्नी विविध चर्चा रंगत असल्या तरी खडसेंनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Intro:जळगाव
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत खाते उघडणे अवघड आहे. त्यामुळे मिळेल त्याला गळाला लावण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. तो कधीच यशस्वी होणार नाही, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या आणि अजित पवारांच्या चर्चित भेटीवर दिली आहे.Body:बुधवारी रात्री अजित पवार आणि भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे यांची गुप्त भेट झाल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चेनंतर आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार खडसेंच्या भेटीला येत असल्याची देखील चर्चा आहे. दरम्यान, एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, असेही यावेळी गिरीश महाजन म्हणाले. या संपूर्ण राजकीय घडामोडींमुळे जळगाव जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

दरम्यान, खडसेंना डावलल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. बहुजन समाजातील नेतेही आक्रमक झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर, भुसावळ आणि जळगाव शहर या मतदारसंघातील भाजपने उमेदवारी जाहीर केलेले उमेदवार देखील पक्षाची उमेदवारी नाकारणार असल्याची चर्चा आहे. हे तिघे उमेदवार कट्टर खडसे समर्थक आहेत. त्यात रावेरचे हरिभाऊ जावळे, भुसावळचे संजय सावकारे आणि जळगाव शहरचे सुरेश भोळे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे खडसेंच्या सून रक्षा खडसे देखील खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.Conclusion:अजित पवार ए. बी. फॉर्म आणणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे खडसेंच्या भेटीसाठी मुक्ताईनगरला येणार असल्याचे सांगितले जात आहे. ते आपल्यासोबत ए. बी. फॉर्म आणणार असल्याचेही बोलले जात आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर खडसे काय निर्णय घेतात, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. खडसेंच्या प्रश्नी विविध चर्चा रंगत असल्या तरी खडसेंनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.