ETV Bharat / state

खासदार रक्षा खडसेंनी बजावला मतदानाचा हक्क; लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करण्याचे आवाहन

author img

By

Published : Jan 15, 2021, 1:31 PM IST

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार रक्षा खडसेंनी सकाळी नऊ वाजता मतदानाचा हक्क बजावला. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले.

खासदार रक्षा खडसेंनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव - रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसेंनी सकाळी नऊ वाजता मतदानाचा हक्क बजावला. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले. कोथळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर ही ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. भाजपच्या खासदार असलेल्या रक्षा खडसेंच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वपूर्ण असणार आहे.

ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्वाची निवडणूकग्रामस्थांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन खासदार रक्षा खडसेंनी केले. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक ही पक्ष विरहित निवडणूक असल्याने यात पक्षीय चढाओढ नसते, ग्रामविकासाच्या दृष्टीने ही महत्त्वाची निवडणूक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा - तुर्तास दिलासा! धनंजय मुंडे यांचा राजीनामा नाही राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.