जळगाव - भुसावळ रेल्वे यार्डचे रिमॉडेलिंग तसेच भुसावळ ते जळगावदरम्यान होणाऱ्या तिसऱ्या रेल्वे लाईनच्या इंटरलॉकिंगच्या कामांसाठी रेल्वे प्रशासनाने ५ ते २० एप्रिलपर्यंत भुसावळ रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या २८ पॅसेंजर आणि १२ एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. याचप्रमाणे ९ रेल्वे गाड्यांच्या मार्गातदेखील बदल करण्यात आला आहे.
ऐन सुट्ट्यांच्या काळात रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे गैरसोय होणार असल्याने प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वे वाहतूक व्यवस्था गतिमान व्हावी, या उद्देशाने मध्य रेल्वे प्रशासनाने भुसावळ रेल्वे जंक्शनमधील यार्डाचे रिमॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात भुसावळ ते जळगावदरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे लाईनचे इंटरलॉकिंग, रेल्वे स्थानकात २ नवे प्लॅटफॉर्म उभारणे, शिवाय इतर आवश्यक विद्युतीकरणाची कामे होणार आहेत.
सदरील कामे करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने २० एप्रिलपर्यंत या गाड्या रद्द केल्या आहेत. भुसावळ स्थानकातून सुटणाऱ्या १२ एक्सप्रेस आणि २८ पॅसेंजर रद्द केल्या आहेत. तिसऱ्या रेल्वे लाईनमुळे रेल्वेच्या वाहतूक व्यवस्थेत गती येऊन अधिक गाड्या धावू शकतील. तर यार्डाच्या रिमॉडेलिंगमध्ये २ नवे प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार असल्याने गाड्या आऊटरवर थांबवण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.
१२ एक्स्प्रेस रद्द-
सूरत-अमरावती एक्स्प्रेस ५ ते १९ दरम्यान तर अमरावती-सूरत ६ ते २० दरम्यान रद्द करण्यात आली आहे. भुसावळ - नागपूर एक्स्प्रेस ५ ते १९ दरम्यान, तर नागपूर-भुसावळ एक्स्प्रेस ६ ते २० दरम्यान रद्द करण्यात आली आहे. अजनी-पुणे १६ एप्रिलला तर पुणे-अजनी गाडी १९ एप्रिलला रद्द करण्यात आली आहे. पुणे-अमरावती १७ ला तर अमरावती-पुणे १८ एप्रिलला रद्द करण्यात आली आहे. पुणे-नागपूर एक्स्प्रेस १८ तर नागपूर-पुणे १९ एप्रिलला रद्द करण्यात आली आहे. हबीबगंज-धारवड एक्स्प्रेस १९ आणि धारवड-हबीबगंज एक्स्प्रेस २० एप्रिलला रद्द करण्यात आली आहे.
रद्द करण्यात आलेल्या पॅसेंजर गाड्या
सूरत-भुसावळ दि. ५ ते १८ एप्रिल
भुसावळ-सूरत दि. ६ ते १९
सूरत-भुसावळ दि. ५ ते १८
भुसावळ-सूरत दि. ६ ते १९
सूरत-भुसावळ दि. ६ ते १९
भुसावळ-सूरत दि. ६ ते १९
मुंबई-भुसावळ पॅसेंजर दि. ६ ते २०
भुसावळ-मुंबई पॅसेंजर दि. ५ ते १९
भुसावळ-देवळाली दि. ५ ते १९
देवळाली-भुसावळ दि. ६ ते २०
भुसावळ-इटारसी पॅसेंजर दि. ४ ते १९
इटारसी-भुसावळ पॅसेंजर दि. ७ ते २२
भुसावळ-कटनी पॅसेंजर दि. ५ ते १९
कटनी-भुसावळ पॅसेंजर दि. ७ ते २१
भुसावळ-नागपूर पॅसेंजर दि. ६ ते १९
नागपूर-भुसावळ पॅसेंजर दि. ६ ते १९
भुसावळ-वर्धा पॅसेंजर दि. ६ ते १९
वर्धा-भुसावळ पॅसेंजर दि. ७ ते २०
भुसावळ-नरखेड दि. ७ ते १९
नरखेड-भुसावळ पॅसेंजर दि. ६ ते २०
इटारसी-पॅसेंजर दि. ५ ते २०
कटनी पॅसेंजर दि. ६ ते २०
वर्धा-बल्लारशा पॅसेंजर दि. ७ ते २०
बल्लारशा-वर्धा पॅसेंजर दि. ७ ते २०